• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

पर्यावरण दिनाचे सोहळे सुरू, पण लातूरचे ‘गायब’ ग्रीन बेल्ट कोण शोधणार?

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 5, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१४७ पैकी ८० ग्रीन बेल्टवर अतिक्रमण; ३० उद्याने ओसाड, शहराची फुफ्फुसेच गुदमरली

लातूर : पर्यावरण दिनानिमित्त शहरभर दिंड्या, वृक्षारोपणाचे कार्यक्रम, सोशल मीडियावरील हिरव्यागार पोस्ट आणि पर्यावरण रक्षणाच्या घोषणा सुरू आहेत. मात्र प्रत्यक्ष वास्तव पाहिले तर लातूर शहरातील पर्यावरणाचे चित्र अत्यंत भयावह आहे. शहरातील १४७ ग्रीन बेल्टपैकी तब्बल ८० ग्रीन बेल्टवर अतिक्रमण झाले असून ३० उद्यानांमध्ये एकही झाड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शहराचा विकास करताना पर्यावरण संवर्धनासाठी राखीव ठेवलेल्या जागांवर आज मंदिरे, समाजमंदिरे, सभागृहे आणि इतर बांधकामे उभी राहिली आहेत. ज्या जागा नागरिकांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या खेळासाठी आणि शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी राखीव होत्या, त्याच जागा आज काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित झाल्या आहेत.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे १४७ पैकी केवळ ३७ ग्रीन बेल्ट सुस्थितीत आहेत. उर्वरित ठिकाणी वॉकिंग ट्रॅक तुटलेले, कंपाउंड वॉल ढासळलेल्या, झाडे नष्ट झालेली आणि मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराची फुफ्फुसेच गुदमरू लागली आहेत.

महानगरपालिकेकडे उद्यानांच्या देखभालीसाठी २९० कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ६ कर्मचारी उपलब्ध आहेत. अनेक वर्षांपासून पदभरतीचा प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडला आहे. मग शहरातील हरित पट्टे वाचविण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो रुपयांची वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. रोपे लावली जातात, छायाचित्रे काढली जातात, प्रसिद्धीपत्रके झळकतात. मात्र आधीपासून अस्तित्वात असलेले ग्रीन बेल्टच नामशेष होत असतील, तर ही सारी धावपळ केवळ कागदी पर्यावरणवाद नाही का?

आयुक्त महोदय, प्रश्न थेट आहे…

पर्यावरण दिनाच्या दिंड्या काढून, सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि वृक्षारोपणाचे फोटो प्रसिद्ध करून शहर हिरवेगार होत नाही. लातूरचे गायब झालेले ८० ग्रीन बेल्ट परत ताब्यात घेण्यासाठी कारवाई कधी होणार? पर्यावरणासाठी राखीव जागांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम कधी सुरू होणार? आणि शहराची फुफ्फुसे असलेल्या या जागा पुन्हा नागरिकांच्या स्वाधीन कधी होणार?

लातूरकरांना आता घोषणांची नाही, तर कृतीची अपेक्षा आहे. अन्यथा पर्यावरण दिन हा केवळ एक दिवसाचा उत्सव आणि उर्वरित वर्षभर पर्यावरणाच्या हत्येचा मूक साक्षीदार ठरत राहील.

Previous Post

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

Next Post

पर्यावरण दिनाच्या दिंड्या बंद करा, आधी ‘गायब’ ग्रीन बेल्ट शोधा!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026

Recent News

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

काँग्रेसच्या घरात जाऊन भाजपचा प्रचार? प्रा. बी. व्ही. मोतीपोवळे यांच्या भूमिकेवर संताप…!

June 5, 2026
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved