
लातूर, दि. ०७ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री ना. पाटील हे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थान येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. सकाळी १०.३० वाजता अहमदपूर येथील नगरपरिषद व्यापारी संकुल येथे मे. विष्णू हरीबा आडाव हरीशकुमार कन्स्ट्रक्शन असोसिएट या कंपनीचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवडी येथे माजी सैनिक संपर्क कार्यालय उदघाटन व संमेलनाला ते उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता शिरूर ताजबंद येथून वाहनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीकडे प्रयाण करतील.

