
प्रभुराज प्रतिष्ठाण, वतीने महिला दिना निमित्त पालात राहणाऱ्या कष्टकरी व मेहनत करून पाऊस हिवाळा व कडाक्याच्या उन्हात कसलेही शरीराची काळजी न करता आपली परिवाराची उपजीविका भागून पुरुषाच्या बरोबरी आयुष्यभर काबाडकष्ट करुण जीवन जगणाऱ्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या सतरा वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाल ठोकुन लोखंडी औजारे बनवीणाऱ्या भटक्या जाती,जमातीतिल कुटुंबाना हक्काचे घर नाही की जमीन परंतु परिस्थितिशी दोन हात करीत हे महिला जीवनाचा एक एक दिवस तापलेल्या लोखंडावर घाव घालून त्याला घडविन्यात घालत आहे.त्या मजूरीतुन कुटुंबाचा पालात गाडा चालविने, हा त्यांचा सिस्ता राहिला आहे.प्रभुराज प्रतिष्ठान मित्राने पालावर जाऊन तेथील महिलांना महिला दिना निमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिले. .

यावेळी प्रतिष्ठाण अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी,अँड. सुरेश सलगरे,पालावरील महिला पदमिनी साळुंके,बीटाबाई साळुंके,राम साळुंके,दीपक सगर,नवनाथ भांडेकर, नवनाथ शिंदे,श्रीकांत लोहार,बळीराम दिवे,सूरज दाने,संदीप डीगराळे,योगेश नागरगोजे,राम ढुमणे, ज्ञानोबा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

