लातूर | दि. ०६ डिसेंबर २०२५
लातूर शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मुख्य आरोपीसोबत गुन्ह्याला मदत करणाऱ्या दोन कॅफे चालकांना पोक्सोच्या गंभीर कलमांखाली अटक केली. शहरात खळबळ उडवणारी ही कारवाई लातूर पोलिसांच्या जलद गतीच्या तपासाचे स्पष्ट उदाहरण ठरली आहे.

घटनेचे धक्कादायक तपशील
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४६८/२०२५ नुसार, ०४ डिसेंबर रोजी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले. मसपोनि सुप्रिया केंद्रे यांनी तातडीने तपास सुरू करून मुलीचा शोध लावला.
चौकशीत पीडितेने उघड केले की —
रिहान गुलाब शेख (वय १८, रा. सेलू) याने तिला जबरदस्ती पळवून नेऊन कॅफे डेली ग्रीन्ड आणि एस.पी. कॅफे डेअर या ठिकाणी नेऊन जबरी संभोग केला.
या धक्कादायक उघडकीनंतर गुन्ह्यांत पोक्सो, बीएनएस, तसेच अ.जा.जा.अ. कायद्यांतर्गत कठोर कलमे वाढविण्यात आली.
मुख्य आरोपीला ताबडतोब अटक
SDPO समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रिहान शेखला ०४ डिसेंबर रोजी अटक केली. त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
कॅफे चालकही गुन्ह्यात ‘सह-आरोपी’ — जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप
तपासात समोर आले की, अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून गुन्ह्यास हातभार लावणारे खालील कॅफे चालकही दोषी —
- सुरज राजेश ढगे (वय २९) – चालक, एस.पी. कॅफे डेअर, खाडगाव टी पॉइंट
- अनिकेत अजय कोटुळे (वय २७) – चालक, कॅफे डेली ग्रीन्ड, खर्डेकर स्टॉप
या दोघांना कलम १७, पोक्सो लावून ०५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ०८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
तांत्रिक पुरावे जप्त — फॉरेन्सिक टीम सक्रिय
मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या सहाय्याने अत्याचाराशी संबंधित महत्त्वाचे तांत्रिक पुरावे जप्त. तपास जलद गतीने सुरू.
कडक इशारा — गुन्हेगारांना मदत केली तर तुरुंग अटळ
लातूर जिल्हा पोलीस दलाचा कठोर संदेश —
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास, माहिती लपविल्यास किंवा आरोपींना मदत केल्यास, लॉज-हॉटेल-कॅफे चालकांवरही पोक्सोखाली गुन्हा दाखल करुन अटक केली जाणार.
कारवाईत सहभागी अधिकारी
या धडाकेबाज ऑपरेशनमध्ये SP अमोल तांबे, अपर SP मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली
SDPO समीरसिंह साळवे, PSI सुप्रिया केंद्रे, आणि पथकातील अंमलदारांचे मोलाचे योगदान.
ही कारवाई लातूर पोलिसांची गुन्हेगारीविरुद्धची कठोर भूमिका स्पष्ट करते आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबतचा शून्य-सहिष्णुत्वाचा संदेश ठळकपणे पोहोचवते.

