• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
September 5, 2025
in Blog
1
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter



बहुतांशी जण रोजगाराचे साधन,परिस्थतीमुळे आलेली संधी म्हणून शिक्षक झालेले पण काही वेगळ्या रसायनाचे व्यक्तीमत्व हे मुद्दामहून शिक्षकी पेशात येवून चाकोरी बाहेर जावून समाज,देशाची सेवा करतात तेव्हा त्यांच्या कार्याला वेगळीच दखलपात्र किनार असते,यात नांदगाव जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे व नांदगाव केंद्राचे प्रभारी मुख्याध्यापक नजीउल्ला बाशामियॉं शेख गुुरुजी यांचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो..इस्लाम धर्माचे संस्थापक महमंद पैंगबर यांची जयंती आणि आज शिक्षक दिननिमित्ताने त्यांच्याप्रती मंगल कामना इच्छितो…
औसा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले खरोसा हे गाव.येथील निजामोद्दीन मुजावर हे तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावले.त्यांनी आपला मुलगा बाशामियॉंला दहावी पयर्ंंतचे शिक्षण दिले.शिक्षणाचा वारसा लाभलेल्या या परिवारातील शहापूरबी-बाशामियॉं या दाम्प्त्यांच्या पोटी मुसा,ईसा,मेहरुनिस्सा,नजीउल्ला,शयनाश,अहेमदपाशा,ताहेराबानू ही सात अपत्ये झाली.बाशामियॉं हे आजही गावी खासगी शिकवणी घेतात,त्यांनी आपल्या या सर्व अपत्त्यांना किमान दहावीच्या पुढेच शिक्षण देवून खर्‍या अर्थाने शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले.यातील मुसा हे शामगिर विद्यालय कोतल शिवणी येथे कलाशिक्षक पदावर आहेत.नजीउल्ला जि.प.सहशिक्षक,तिसरे ईसा हे किराणा दुकान आणि मालवाहू टेम्पोचा व्यवसाय करतात.चौथे अहमदपाशा हे विद्युत सहाय्यक आहेत.कन्या त्यांच्या सासरी सुखात आहेत.या कुटूंबाला थोडीशी शेतीही आहे.
शिक्षणःशेख परिवारातील नजीउल्ला यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.पाचवी ते आठवीपर्यंतच्या इयत्ता त्यांनी खरोसा येथील नवभारत विद्यालयातून केल्या. नववी व दहावी कोतल शिवणी येथील शामगीर विद्यालयात भावाच्या सानिध्यात पूर्ण झाले. १९९२ मध्ये दहावीला नजीउल्ला यांना ७९.१४ टक्के गुण मिळाले. मग त्यांनीही शिक्षकी पेशाची परंपरा चालविण्याचा निश्‍चय केला.त्यासाठी मुरुड येथील शासकीय अध्यापक विद्यालयात प्रवेश घेवून १९९२-१९९४ या दोन वर्षात त्यांनी डी.एड.पूर्ण केले.
आनंदाचा क्षणःवशिल्याच्या त्या काळात आपली काय दाळ शिजणार.. म्हणून नोकरी नाही म्हणून ते घरचे किराणा दुकान आणि पोल्ट्री फॉर्मवर भावासोबत काम करत राहिले.पण वेळ यावी लागतात म्हणतात तसे १९९६ मध्ये परभणी जिल्हा निवड मंडळाने शिक्षक भरतीची वृत्तपत्रात जाहिरात काढली होती,त्यानुसार नजीउल्ला यांनी लेखी अर्ज केला.निवड मंडळापुढे तोंडी परीक्षा दिली वाट पाहात राहिले.पण एके दिवशी ते असेच किराणा दुकानात बसले असता गावचा अमीन टप्पेवाला पोस्टमन तिथे आला.हातातील एक कागद खाली टाकत त्याने हे बग काय आलेय तुझं, म्हणत टेकला.नजीउल्लाने ते एक पानी तीन घड्या घालून टाचणी मारलेला कागद उघडून वरुन वाचले …तेव्हा त्यांची शिक्षकी पेशासाठी निवड होवून त्याला नियुक्त्यांच्या जागी रुजू होण्यास सूचीत केले होते.ते वाचून नजीउल्लांच्या चेहर्‍यावर आनंदाची छटा उमटली, तेव्हा पोस्टमनने त्याला,अरे काय झाले म्हणून आश्‍चर्याने विचारले तेव्हा.मला शिक्षकाची नोेकरी लागली अशी आंनदाची वार्ता सांगितली,आणि गोविंद बिडीची तल्लफ असलेल्या त्या पोस्टमनला दोन गोविंद बिड्या नाहीतर बिडीच्चा कट्टा आणि काडीपेटीच देवून टाकली.ही निवडीची बातमी पोस्टमनने गावभर केली.हा आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे ते सांगतात.
शिक्षकपदी नियुक्तीःशिक्षक भरती निवड मंडळाच्या आदेशानुसार नजीउल्ला शेख हे जिल्हा परभणी,तालुका जिंतूरमधील सांगळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल होवून २२ जुलै १९९६ रोजी रुजू झाले. या गावात पुढे सलग चार वर्षे त्यांनी येथे अध्यापनाचे काम केले.नंतर स्वजिल्हा लातूरमध्ये त्यांची जिल्हा बदलीने बदली झाली.२००० मध्ये ते जोडजवळा ता.जि.लातूर येथील प्राथमिक शाळेत ते कार्यरत झाले. इथे एकदोन नव्हे तर तब्बल सात वर्षे त्यांनी अध्यापन कार्य केले. आणि समयोजनाने त्यांची कासारखेडा येथे बदली झाली,याही गावात ते साडेसहा वर्षे कार्यरत होते. पुढे तालुका बदल आणि आपसी बदलीने जून २०१३ साली ते खरोळा येथील केंद्रीय जिल्हा परिषद कन्या शाळेत रुजू झाले.२०१७-२०१८ मध्ये पुन्हा ऑनलाईन बदलीच्या प्रक्रियेत त्यांना लातूर जवळील नांदगाव केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काम करण्याची संधी मिळाली. आजही ते येथेच कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे केंद्रीय प्रभारी मुख्याध्यापक पदाची अतिरीक्त जबाबदारी आलेली आहे. आपल्या शाळेतील दररोजचे अध्यापन आणि हा केंद्रीय भार ते लिलया सांभाळत आहेत. ते करणार्‍यालाच समजते.
उच्च शिक्षणःनजीउल्ला शेख हे दहावी डी.एड या शैक्षणिक अर्हतेवर समाधान मानणारे नव्हते,त्यांनी औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्राच्या बी.ए. वर्गाला प्रवेश घेवून पदवी पूर्ण केली आहे. एवढेच नव्हे डीएसएम(डिप्लोमा ईन स्कूल मॅनेजमेंट) हा कोर्सही पूर्ण केला आहे.पुढे शैक्षणिक संप्रेक्षण हा एम.ए.चा प्रथम वर्ष केला.दुसरा वर्ष बाकी आहे.तेही पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे.
समव्यवसायी पत्नीःमाणसाच्या जीवनातील विवाह ही एक महत्वाची घटना आहे.गुुरुजींच्या पेशाला साजेसे आणि डी.एड.शिक्षण पूर्ण झालेलेे स्थळही त्यांना मिळाले. लातूरच्या उस्मानपूरा येथील रहिमाबेगम शेख यांच्याशी त्यांचा दि.२३ मे १९९९ रोजी धार्मिक विधीनुसार विवाह पार पडला.त्यांची कासारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर गुणवत्तेनुसार प्रथम नियुक्ती मिळाली.पुढे त्यांनाही लातूर पंचायत समितीचा तालुका स्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार मिळाला आहे.
मुलेही उच्चशिक्षितः शेख पती-पत्नी शिक्षकी पेशात असल्याने त्यांनी आपल्या मुलांच्याही शिक्षणावर भर दिला. आज त्यांचा थोरला मुलगा एमएस्सी, तर लहान मुलगा बीबीए द्वितीय वर्षे करतो आहे.
लेखन प्रपंचः शेख गुरुजींनी शैक्षणिक अध्यापनाच्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून वृत्तपत्रातून लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण आपला हक्क आहे आणि अंधश्रध्दा निर्मूलनामध्ये संतांचे कार्य यासारखे लेख वृत्तपत्रातून लिहून त्यांना आपली लेखन कला दाखविली आहे.
अनेकांचा स्नेहः माणसाच्या जडणघडणीत अनेकांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ मिळालेली असतो आणि माणूस त्याची काळजाच्या कप्प्यात साठवणूक करत असतो,नजीउल्ला यांना गावच्या सार्वजनिक ग्रंथालयामुळे वाचनाची सवय जडली,ते महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्याच्या बातम्या वाचून प्रभावीत झाले.त्यांनी त्यांचा पत्ता शोधून,या कार्यात सहभागी होण्याची पोष्टकार्डद्वारे त्यांच्याकडे ईच्छा व्यक्त केली.त्यांनी लातूर जिल्हाध्यक्ष माधव बावगे यंाच्या संपर्क साधण्याचा सल्ला दिला.त्याप्रमाणे ते राजर्षी शाहू महाविद्यालयात बावगे यांना भेटले.आणि इथून ते अंनिसशी जोडले गेले.पुढे साथी रामकुमार रायवाडीकर,अनिल दरेकर, सुधीर भोसले, बाबा हालकुडे आदिंशी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कायमचे जोडले गेले,त्यामुळे त्यांचा सामाजिक सेवेचा एक प्रकारचा आत्मविश्‍वास दुणावला.अंनिसमध्ये ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.एका शिक्षकाचा वैज्ञानिक दृष्टिकोण जागविण्यासाठी आवश्यक असलेला परिवार त्यांना यानिमित्ताने लाभला, असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.तानाजी रोंगे,शिवाजी गावकरे,मुसा मुजावर,गंगाधर मुळजे,चॉंदपाशा पठाण,बलराज जाधवर,इंजिनिअर सिद्दीकी साहेेब,कृृषीमित्र बालाजी दहिफळे यांचाही आपल्या घडणीत वाटा असल्याचे ते म्हणाले.
रक्तदानात सहभागः केवळ शाळा,अध्यापन यापलिकडे जात नजीउल्ला शेख यांनी मानवतावादी भावनेतून अनेकदा रक्तदान शिबिरात सहभाग घेवून अकरा वेळा श्‍वेच्छा रक्तदान करुन राष्ट्रीय भावना दाखवून दिली.
बालविवाह रोखलेःशेख गुरुजींनी चाकोरीबाहेर जात सामाजिक भावनेतून,शासनाच्या आदेश,निर्णयाचा अंमल व्हावा यासाठी कार्य केले.आपल्या अवती भोवती सर्वसामान्य परिवारातील काही पालक अनेक कारणाने विशेषतःकायद्याचे अज्ञान,गरीबी असल्याने आपल्या अल्पवयीन मुला-मुलांचे विवाह लावून मोकळे होते,त्यांचे पुढे शारीरिक दुष्परिणाम काय होतात,याची त्यांना कल्पना नसते,कायद्याचे उल्लंघन केले तर गुन्हे दाखल होवू शकतात.ही वाईट वेळ त्यांच्यावर येवू नये म्हणून त्यांचे प्रबोधन करणे,त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे,त्यांच्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीच्याच बालविवाहाची पत्रिकाच त्यांच्या हातावर पडली आणि त्यांना या लग्नासाठी येण्याचा आग्रही विनंती झाली.तथापि ते अस्वस्थ झाले.त्यांनी मुलीच्या पालकांची भेट घेतली तेव्हा त्यांना मुलीचे आई-वडील नाहीत,आम्ही नातेवाईक पती-पत्नी कामानिमित्त नेहमी बाहेर असतो,ही लहान मुलगी घरात राहते,काही झालं तर काय करायचं,नवरा मुलगा जवळचा,चांगल्या स्थितीतला म्हणून लग्नाची घाई करतोय असे सांगण्यात आले.त्यावर गुरुजींनी त्यंाचे प्रबोधन करुन तो विवाह अखेर दोन वर्षे पुढे लांबविला.नजीउल्ला शेख यांनी सर्वसामान्य घरातील अकरा अल्पवयीन पाल्यांचे बालविवाह रोखले आहेत.
अंधश्रध्देला ठोकरःशिक्षक,कर्मचारी अधिकारी असो वा बहुतांश सर्वसामान्य नागरिकांमध्ये आजही भूतखेत,जादूटोणा,करणी भानामती याबद्दल एक प्रकारची भीती आहे,पण शेख गुरुजी याला अपवाद आहेत, ते एक तर विज्ञाननिष्ठ व्यक्तीमत्वाचे असूून,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कामात तनमनधनाने सामील आहेत.त्यामुळे त्यांना अशा अवैज्ञानिक गोष्टीवर विश्‍वास नाही,हे त्यांनी प्रत्यक्ष जगून दाखविले तर ते असे की एके दिवशी नांदगाव येथील शाळा परिसरात त्यांना कुंकू,हळद,चोळी,चोळीचा खण,साडी,नारळ अशा वस्तू कोणीतरी टाकून गेल्याचे आढळून आले.अन्य शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी त्यामुळे दचकले पण शेख गुरुजींनी त्यातला नारळ उचलला आणि म्हटले, हा मी आता खाणार,आणखी कोण कोण खाणार आहे,असे विचारले पण मोठे विद्यार्थी आणि सहकारी शिक्षकही त्यासाठी पुढे येईनात.मग गुरुजींंनी न भिणार्‍या लहान मुलांसमवेत तो नारळ फस्त करुन यात काहीही जादू टोणा-भूत नसते हे दाखवून दिले.
पर्यावरणप्रेमीः पर्यावरणाचे संतुलन राखणे हा कळीचा मुद्दा बनला आहे. ते सर्वांचे आद्य कर्तव्य ठरले आहे.झाडे वाचवा,श्‍वास वाचवा असं म्हणण्याची वेळ येत आहे,अशा वेळी सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे.बालपणापासूनच गुरुजींना वृक्षाविषयीचे प्रेम आहे.वृक्ष लागवड करुन,त्यांचे संगोपन करण्यात त्यांना स्वारस्य आहे. राहते घर असो,शाळेचा परिसर असो,सार्वजनिक जागा असो की आपली शेतीवाडी येथे वृक्षांची लागवड करण्याची त्यांची धडपड चालू असते. अगदी स्वतःच्या शेतीच्या बांधावर आंबा,चिकू, चिंच,जांभळ,शेवगा,नारळ आदी फळे,भाजी पाल्याची अनेक झाडे लावून त्यांचे योग्य प्रकारे संगोपन केले आहे. एवढेच नाही तर पाणी आडवा,पाणी जिरवा साठी त्यांनी आपल्या घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
शाळेबाहेरचे आत घातलेःआर्थिक परिस्थितीमुळे,व्यसनी पालकामुळे,किंवा आई,वडील नसल्यामुळे,असले तरी ते बालकांच्या शाळेबद्दल दक्ष नसतील तर शाळेच्या प्रांगणा ऐवजी,गॅरेज,हॉटेल्स,गुरांच्या मागे,शेळ्यांच्या मागे लावले जातात,नाविलाज म्हणून ती बालके तिथे बांधले जातात, अशा वेळी सुजान नागरिकांनी त्यांची परिस्थिती समजून घेवून त्याला शाळेच्या वर्गात नेण्यासाठी पुढे आले पाहिजे,ही भावना शेख गुुरुजींच्या मनात खोल घर करून आहे,त्यांच्या या मानवतावादी मनोभूमिकेमुळे ६ ते १४ वर्षे वयोगटातील सोळा बालकांना जिल्हा परिषद वा खासगी शाळेत जाता आले आहे,त्यातील काही मुले आज दहावीच्याही पुढे शिक्षण घेत आहेत.याबद्दलचा अभिमान त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असतो.
अनेक पुरस्कारःकाम करणार्‍या व्यक्तीची त्यातल्या त्यात उल्लेखनीय आणि हटके काम करण्याची दखल घेतलीच जाते,नजीउल्ला शेख यांच्या चाकोरीबाहेरच्या कामाचीही पावती त्यांना विविध पुरस्काराच्या रुपाने लाभलेली आहे.२०१८-२०१९ चा रेणापूर पंचायत समिती शिक्षण विभागाने त्यांना तालुकास्तरीय गुुरुगौरव पुरस्कार देवून दि.५ सप्टेंबर २०३ रोजी गौरविले आहे.सहारा एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन परभणीचा २०१८ मध्ये गुरुगौरव पुस्कार मिळाला आहे.भारतीय दलित साहित्य अकादमीची डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप नॅशनल अवॉडर्र् २०१९ मध्ये लाभली,कोरोना काळातील कामासाठी समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनी त्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानीत केलेय.असे एक नव्हे तर १ राष्ट्र,१३ राज्यस्तर,दोन जिल्हास्तरीय आणि एक महाराष्ट्र शासनाचा तालुकास्तरीय पुस्कार त्यांना मिळाले आहेत.
पालकाच्या भूमिकेतले गुरुजीःशांत,संयमी,निगर्वी,मनमिळावू,निर्व्यसनी,अध्यापनात रमणारे,पडेल तो भार तेवढ्याच कुशलतेने वाहणारे नजीउल्ला शेख यांनी आपल्या वयाच्या ४९ वर्षातील २९ वर्षीय सेवाकाळात नेहमीच पालकांच्या भूमिकेतून वर्तन केले आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणे,अज्ञान,अहिंसा,सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता,एकमेकांप्रती आदरभाव,लहान सहान उत्सवातून पर्यावरणपुरक वातावरण करणे,मुलांमधील न्यूनगंड दूर करणे,स्वावलंबन यावर त्यांचा भर राहिलेला आहे.मतदान वाढ जागृतीसाठी शाळेत कार्यक्रम राबविला.अशाच पालकांच्या भूमिकेत वावरत या देशाचे सुदृढ,वैज्ञानिक,सुजाण,गुणवान नागरिक घडविण्यासाठी धडपडणार्‍या तमाम गुरुजनांंनासह नजीउल्ला शेख यांना सादर प्रमाण..!
बाळ होळीकर
लातूर
मो.नं.९१७५१०३७६७

Previous Post

ग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे.

Next Post

डॉ. संदीपान जगदाळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

डॉ. संदीपान जगदाळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Comments 1

  1. Bal Holikar says:
    5 months ago

    आपण एका धडपड या शिक्षकाला न्याय दिला त्याबद्दल आपले अभिनंदन..

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

काय म्हणते लातूर… बदलते लातूर…स्व. विलासराव देशमुख, बाळासाहेब आंबेडकर यांचा जादुई चमत्कार…

January 17, 2026

लातूर जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थिनी मृत्यू प्रकरनी एस आय टी नियुक्त पोलिस अधीक्षक पत्रकार परिषद

January 17, 2026

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यासपुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

January 15, 2026

लातूर महानगरपालिका निवडणूक मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

January 14, 2026

Recent News

काय म्हणते लातूर… बदलते लातूर…स्व. विलासराव देशमुख, बाळासाहेब आंबेडकर यांचा जादुई चमत्कार…

January 17, 2026

लातूर जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थिनी मृत्यू प्रकरनी एस आय टी नियुक्त पोलिस अधीक्षक पत्रकार परिषद

January 17, 2026

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यासपुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

January 15, 2026

लातूर महानगरपालिका निवडणूक मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

January 14, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

काय म्हणते लातूर… बदलते लातूर…स्व. विलासराव देशमुख, बाळासाहेब आंबेडकर यांचा जादुई चमत्कार…

January 17, 2026

लातूर जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थिनी मृत्यू प्रकरनी एस आय टी नियुक्त पोलिस अधीक्षक पत्रकार परिषद

January 17, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved