
10 नोव्हेंबर 2024 रोजी दुसऱ्या वर्षात पदार्पण करत एक मोठा इतिहास प्रत्युष उद्योग समूह यांनी रचला आहे…
700 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत शिवम रिसॉर्ट उदगीर या ठिकाणी मोठ्या थाटामाटात प्रत्यूष चे पहिले वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले…

10 नोव्हेंबर 2023 रोजी 10×10 च्या रूम मधून केलेली सुरुवात आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 20 पेक्षा जास्त आउटलेट साडेपाच हजार डिस्ट्रीब्यूटर बेस आणि लाखोंचा कस्टमर बेस उभा करत प्रत्युष उद्योग समूहाने वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये एक मराठी पाऊल रुजवले आहे.
मराठी माणूस धंदा करू शकत नाही या गोष्टीवर ठामपणे विरोध करत दोन मराठी तरुणांनी उभा केलेला हा उद्योग समूह आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत आहे.
याप्रसंगी आलेल्या डिस्ट्रीब्यूटर च्या ज्या भावना होत्या की प्रत्युष उद्योग समूहाने त्यांना स्वबळावर आत्मनिर्भर करून एक हक्काचे व्यासपीठ दिले. आज हजारो परिवार आहेत जे प्रत्युष उद्योग समूहाच्या माध्यमातून मासिक दहा हजार रुपये उत्पन्न कमीत कमी कमवत आहेत. याप्रसंगी महाराष्ट्रातील सर्व स्टोअर ओनर यांनी प्रत्युष चे तोंड भरून कौतुक केले…
इतका मोठा क्षण आणि इतके भाऊक झालेले लोक पहिल्यांदाच एका मंचाजवळ बघायला मिळाले…
कंपनीचे ओनर राहुल बिरादार सर व कीर्ती बिरादार मॅडम यांनी सर्वांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की पुढील वर्षी कंपनीचे व्हिजन कंपनीचे ग्रोथ कशी असेल.
प्रत्युष उद्योग समूहाच्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्युष ची एक व्हिजिनरी मॅनेजमेंट आणि इथिकल प्लॅटफॉर्म म्हणून ओळख होत चालली आहे…
प्रत्युष उद्योग समूहाचे महाराष्ट्रात तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रात एकच चर्चा चालू आहे…
या प्रसंगी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल बिरादार , कीर्ती बिरादार , सुनीता बिरादार, पल्लवी बिरादार, सुनीता तनपुरे, जयवंत तनपुरे, शांताराम तनपुरे, ज्वेलरी पार्टनर राजेश पाटील, समिधा पाटील, लातूर स्टोर ओनर अक्षय मोरे, तसेच महाराष्ट्रातील सर्व स्टोअर ओनर, सर्व स्टार डायरेक्टर स्वाती सुतार, दिपाली गिरी, कल्पना सुतार, अभिलाषा बागल, दिपाली करपे, दिपाली खरात, माधुरी व्यवहारे, सुनिता शेळवाणी तसेच सर्व प्रत्युष परिवार उपस्थित होता.


