
संविधान अमृत महोत्सवानिमित्त डॉ.अर्चनाताईंनी साधला संवाद
लातूर प्रतिनिधी : मागच्या अनेक वर्षांपासून कचऱ्यामुळे लातुरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वाढत्या मूलभूत समस्यांमुळे लातूरकरांचा श्वास गुदमरत आहे.लातूरला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी,मूलभूत समस्यांची सोडवणूक करून लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मी मैदानात उतरले असल्याचे लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.
अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
संविधान अमृत महोत्सवानिमित्त शहरातील विलासनगर येथे डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.अर्चनाताई बोलत होत्या.व्यासपीठावर शैलेश गोजमगुंडे,संजय कांबळे, जयकुमार सकट,कावेरीबाई सकट,सचिन काळे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. अर्चनाताई म्हणाल्या की, महायुतीचे भाऊ देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेतून लाडक्या बहिणींना पैसे नाहीतर ‘सन्मान’ मिळवून दिला आहे.आर्थिक सक्षम झाल्याने महिलांना कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही.लातूरच्या नेतृत्वाने कधीही आपल्या परिसरात येऊन येथील नागरिकांचे सुख दुःख जाणून घेतले नाही.ज्या कामावर येथील नागरिकांचे जीवन अवलंबून होते ती कचरा संकलनाची निविदा रद्द करुन उपासमारीची वेळ आणली आहे. या निवडणुकीत आपल्या हक्कासाठी मी मैदानात उतरले आहे.आपल्याशी संवाद आणि संपर्क कधीही तुटू देणार नसल्याची ग्वाही यावेळी डॉ. चाकूरकर यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले की, केवळ कमिशन मिळत नसल्याने जनाधार संस्थेची निविदा रद्द करण्यात आली.जनाधार संस्थेच्या २७० कर्मचाऱ्यांना घरी बसवून गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून घेणाऱ्या आमदाराला घरी बसवण्यासाठी, आपल्या लाडक्या बहिणीला प्रचंड मतांनी निवडून द्यावे,असे आवाहनही गोजमगुंडे यांनी केले.
या मेळाव्यास संतोष कांबळे, श्रीहरी काळे,सुधीर कांबळे, विकी कांबळे,अमर सकट, विशाल कावळे,संदिपान काळे, करण कसबे,सुनिल सकट, आकाश सकट आदींसह विलास नगरातील रहिवासी,महायुतीचे कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



एकदम भारी