लातूर : एकुरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते विनायक सूर्यभान सावंत यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘शिवरत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने उपक्रमशील राहून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सावंत यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. संजीवनी ब्लड सेंटरच्या माध्यमातून रक्तदान चळवळीला प्रोत्साहन देत त्यांनी सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटविला आहे.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्नशील राहण्याबरोबरच समाजसेवेचा वसा जपत त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला ‘शिवरत्न पुरस्कार २०२६’ हा त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा सन्मान मानला जात आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल विनायक सूर्यभान सावंत यांचे मित्रपरिवार, सहकारी व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
