
लातूर, १३ एप्रिल –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत दयानंद कला महाविद्यालयाच्या लेझिम-ढोल पथकाने उत्साहवर्धक आणि चित्तथरारक सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दयानंद शिक्षण संस्था प्रांगणातून सुरू झालेल्या या पदयात्रेचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पांढरे शुभ्र कुर्ते-पायजमा आणि डोक्यावर निळे फेटे घालून नृत्य सादर करताना एकतेचा आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला. ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या आणि सामाजिक सलोख्याच्या स्फुरणदायी वातावरणाने भारलेला होता.

या लेझिम पथकात अधिराज जगदाळे, सुरज गोरे, निकिता कापसे, श्रद्धा नरसिंगे, अनुषा पिटले, स्नेहल जाधव, भावना वाघमारे, संजय जाधव, साईकिशन सोनवणे आदींसह एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना डॉ.



