• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

आज, उद्या व परवा शहराच्या उत्तर परिसरातील वीजपुरवठा सायंकाळी बंद राहील

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
May 5, 2025
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : शहरातील उत्तर परिसरातील उच्चदाब वीजवाहिन्या बदलणे, उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरूस्ती करण्याकरिता मंगळवार दि.६, बुधवार दि.७ मे व गुरूवार दि.८ मे या दरम्यान टप्या-टप्याने ३३/११ केव्ही आर्वी, एमआयडीसी व जीआयएस उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या वीजवाहिनीवरील परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ५ ते ६:३० दुसऱ्या टप्प्यात ६:३० ते ८ तर तिसऱ्या टप्प्यात रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. वीजग्राहकांनी सदरील दिवसाची व वेळेची दखल घ्यावी असे महावितरणने कळवले आहे.

मंगळवार दिनांक ६ मे रोजी ३३ केव्ही आर्वी उपकेंद्रावरून वीजपुरवठा होणाऱ्या साईबाबा वीजवाहिनीवरील धायगुडे नगर, सह्याद्री अपार्टमेंट, कृष्णाई अपार्टमेंट, दत्तसहवास सोसायटी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ५ ते ६:३० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ३३ केव्ही एमआयडीसी उपकेंद्रावरील चैतन्य वीजवाहिनीवरील बाईकाकाजी, मेरीडियन, येडेश्वरी, उदय सेल्स इत्यादी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ५ ते ६:३० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ३३ केव्ही जीआयएस उपकेंद्रावरील सोनानगर वीजवाहिनीवरील सोना नगर, कोंबडे डी पी, कुलस्वामिनी नगर, शिवशंकर कॉलनी, विठ्ठल रुक्मिणी नगर, अवंती नगर, सय्यद नगर, मथुरांगण सोसायटी, निक्की बार मागील बाजूचा परिसर, साई शाळा जवळील एरिया, कृषिधन सोसायटी पांचाळ च्या शेता जवळील भाग, भगवान शाळेजवळील परिसर, कोर्ट कॉलनी, साने गुरुजी शाळा जवळील भागाचा वीजपुरवठा सायंकाळी ५ ते ६:३० वाजेपर्यंत बंद राहील.

दुसऱ्या टप्प्यात ११ केव्ही शिवाजी चौक वीजवाहिनीवरील विशाल नगर श्याम नगर, बँक कॉलनी, समता सोसायटी, कैलास नगर, इदगाह मैदान भाग, उषाकिरण भाग, गगन विहार, श्याम नगर, साई मंदिर शेजारील भाग, बोधी चौक, विक्रम नगर, चवंडा हॉस्पिटल शेजारील भाग द्वारका नगरी, सुभाष नगर, चाणक्य नगर, अजंठा नगर, सचिदानंद नगर, पाण्याची टाकी बार्शी रोड, श्री नगर, बार्शी रोड, इत्यादी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच एनदत्ता वीजवाहिनीवरील नवजीवन टायर्स भाग, स्वामी विवेकानंद कॉलेज भाग, गंगा पाईप्स भाग, लोकमत, ४ नं बस स्तोप भाग, पी. व्ही.आर भाग, एमआयडीसी उ‌द्योग मित्र, ५ नं. पोलीस चौकी भाग इत्यादी परिसराचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते ८ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ११ केव्ही गंगासागर वीजवाहिनीवरील बुरहाण नगर, मालवती रोड, गंगासागर रेसिडेन्सी, शांताई मंगल कार्यालयाचा परिसर आदी भागाचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहीलमंदिर परिसर तसेच एमआयडीसी परिसराच्या भागातील वीजपुरवठा रविवारी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील. तसेच ११ केव्ही जुनी रेल्वे लाईन वीजवाहिनीवरील एस एम बार (मच्छी मार्केट) जवळ असलेल्या एबी स्विच पासून चालू होऊन पद्दीले डी पी, गिरवलकर नगर, वाल्मीक नगर आमलेस्वर नगर, पंचवटी नगर, चौधरी नगर, पठाण नगर, विकास नगर, न्यू भाग्यनगर, दयानंद कॉलेज, जी एस पाटील मळा, नरहरे डीटीसी, बुलढाणा डीटीसी वरील भागाचा वीजपुरवठा सायंकाळी ६:३० ते ८ वाजेपर्यंत बंद राहील.

तिसऱ्या टप्प्यात ११ केव्ही स्वामीसमर्थ वीजवाहिनीवरील सोहेल नगर, सूळ नगर, केशव नगर, विक्रम नगर श्याम नगर, रामजी सुभेदार नगर, आग्रोया नगर, स्वामी समर्थ नगर, इंडिया नगर, एलआयसी ऑफिस परिसर तसेच ११ केव्ही द्वारका वीजवाहिनीवरील शारदा नगर, रेणुका नगर, व्यंकटेश नगर, गोरक्षण, मणियार नगर, टाके नगर, कल्पना नगर, कैलास नगर, जटाळ हॉस्पिटल भाग, श्रमसाफल्य सोसायटी, एसपी ऑफिस, मथुरा सोसायटी, संजय क्वालिटी भाग, केशवराज शाळा भाग, नवीन रेणापूर नाका ते शिवाजी चौक जाताना उजव्या हाताच्या भाग तसेच तंत्र निकेतन फीडरवरील जिजामाता शाळा परिसर, पवर पाठीमागील भाग, एमआयडीसी कॉलनी, एमआयडीसी भाग, हडको परिसर, आरती व मयूर डीपी, पतंजली जवळील भाग, महिला तंत्रनिकेतन कॉलेज त्याचबरोबर न्यू शासकीय फीडरच्या हडको कॉलोनी, शासकिय कॉलोनी, न्यू कलेक्टरऑफिस, इत्यादी परिसराचा वीजपुरवठा रात्री ८ ते ९:३० वाजेपर्यंत बंद राहील.

३३/११ केव्ही आर्वी उपकेंद्राच्या शारदा नगर फीडरवरील भिसेन नगर, रामचंद्र नगर, व्यंकटेश नगर, अजिंक्य सिटी, मा बाप कॉलनी, मयुरबन सोसायटी, मधुबन मैत्री पार्क, प्रयागबाई कॉलेज भाग, बालाजी मंदिर भाग, जुना रेणापूर नाका परिसराचा वीजपुरवठा रात्री ०९:३० ते ११वाजेपर्यंत बंद राहील.

दि.६ मे ते ८ मेच्या दरम्यान टप्प्या टप्प्याने वीजपुरवठा बंद राहील वीजग्राहकांनी सदरील वेळेची दखल घेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

खंडीत वीजपुरवठयाबाबत सनियंत्रण कक्षाच्या ७८७५७६२०२१ या मोबाईल क्रमांकावर २४ तास तसेच १९१२, १८००२१२३४३५ व १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Previous Post

कामगार दिनी महावितरणच्या ३८ गुणवंत कामगारांचा गौरव

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा 'संविधानिक अधिकार' नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved