ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळाले, त्यांनाच ॲड.बाळासाहेब आंबेडकर समजतील.कारण येणारी विधान सभेचे निवडणूक, ही आपल्या अस्मितेच्या स्वाभिमानाची लढाई आहे. म्हणून समाजातील वंचित असणाऱ्यांनी स्वतःहून सहभाग नोंदवावा. तसेच दलित + आदिवासी + ओबीसी = सत्ता हे समीकरण वास्तवात उतरविण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे राजकारण म्हणून न पाहता. आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा घासातला घास कोणी हिसकावून घेणार नाही, या साठी वंचित बहुजन आघाडी सोबत घट्ट रहा . कारण “अभी नहीं तो कभी नहीं”
आरक्षण धोक्यात आहे. एवढेच लक्षात घ्या, हीच ती वेळ आहे. आरक्षण वाचविण्यासाठी . बाळासाहेबांना सहकार्य करा नाही तर जीव लाऊन जीव घेणारी व्यवस्था सक्रिय आहे. हे पण लक्षात असू दया, स्वतःच्या स्वार्थासाठी येणारी पिढी बरबाद होणार नाही, याची पण काळजी घ्या . आपलं मत वाया जाईल , वंचित भाजप ची बी टीम आहे . वंचित लहान पक्ष आहे . त्यांनी एवढ्या जागा घ्यायला पाहिजेत , त्यांनी अमुक , तमुक पक्षा सोबत युती करायला पाहिजे . अश्या तथ्यहीन वायफळ चर्चा आणि भूलथापाना बळी पडू नका , आपलं मत आपल्याच माणसाला दया , आपल्याच माणसाचे हात बळकट करा , स्वतःची शाबूत झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मूर्खपणा आहे, हेही बाबासाहेबांचे विचार डोक्यात असू दया,
बाळासाहेब, दलित+आदिवासी+ ओबीसी यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी राजकारण करतात. त्यांनी केवळ आपल्या समाजाचा विचार करावा, हा संकुचित विचार आणि गैरसमज डोक्यातून काढून टाकावा.कारण एकट्या समाजाच्या मतांवर आपले प्रतिनिधी येत नाहीत. त्यासाठी अठरा पगड जातींना सोबत घेऊन येथील प्रस्थापितांचा डाव हाणून पाडण्यासाठी आपण व्यापक होणे महत्वाचे आहे . भाजप ,काँग्रेस , शिवसेना , राष्ट्रवादी , हे कुठल्या विचार धारेचे आहेत. हे तुम्हा, आम्हा सर्वांना माहीत आहे. तरी सुद्धा ते विभागून जरी झाले तरी ते त्यांच्या माणसाला निवडून आणतात .हे आपण झालेल्या लोकसभा निवडणुक मधून आपल्याला दिसून आले . नाहीतर एकट्या मराठा समाजाचे ३१ खासदार निवडून आले नसते.
प्रत्येक पक्षात अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक विभाग आहे. तुम्हाला विभागात राहायचे, की अख्या पक्षात हे तुम्ही ठरवायला हवे . प्रतिनिधित्व प्राप्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड संघर्षातून येथील दीन पददलित, बहुजन समाजाला समता ,न्याय स्वातंत्र्य आणि बंधुभाव चे विचार देऊन गुलामीचे जीवन जगत असलेल्या समाजाला स्वाभिमानाचे जीवन जगायला शिकविले . आणि जीवन जगण्यासाठी आचार विचारांची प्रणाली देऊन समस्त बहुजन समाजाला माणूस बनविले .
पण दुर्दैव असे की आज सुद्धा ही स्वाभिमानाची लढाई संपलेली नाही कारण या देशाला गोचीडा सारखी चिकटून असलेली वर्ण व्यवस्था आज ही माणसा माणसात भेद करतांना दिसत आहे. या मुळे आजच्या या आधुनिक काळात सुद्धा जीवन जगण्यासाठी माणसाचं अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. अश्याही काळात माझा माणूस स्वाभिमानाने माणूस म्हणून जगला पाहिजे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी निर्माण केलेल्या आरक्षणाला संरक्षण देण्याचं काम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून बहुजनांना हक्क प्राप्त करून दिले आहेत. हे हक्क म्हणजे माणसाला माणसा सारखे जगता आले पाहिजे . आरक्षण म्हणजे माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने स्वतःच्या हक्काच्या घरात माणसा सारखे जगता यावे ही धडपड या महामानवांची होती . परंतू व्यवस्थेतील गब्बर मनी मसल च्या जोरावर शोषित वंचितांना दाबण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. या जात्यांध माणसाच्या पोटात हे सुरुवाती पासूनच दुखायला लागले होते . हे सर्वांनाच माहीत आहे. कारण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओबीसी यांच्या आरक्षणासाठी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हे सर्वश्रुत आहे. याच मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्वान नातू श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाची सुरुवात सुद्धा ओबीसींच्या न्याय हक्क मिळविण्या पासूनच सुरु झाल्याचे दिसून येते. श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे अख्खं आयुष्य एस सी , एस टी आणि ओबीसी बांधवांच्या उद्धारासाठी खर्ची झालेले पहावयास मिळते . हे आपण त्यांच्या भारिप बहुजन महासंघ पासून ते वंचित बहुजन आघाडीचा प्रवास अभ्यास केला असता लक्षात येईल.
आज ही एस सी, एस टी आणि ओबीसी समाजावर काही संकट आल्यास श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जीवाची पर्वा न करता त्यांच्या संरक्षणासाठी मैदानात उतरतात व त्यांना न्याय मिळून देतात. हा आजा पर्यंतचा इतिहास आहे.
एस सी , एस टी आणि ओबीसी मध्ये अनेक खंडीभर नेते आहेत. परंतू ते व्यवस्थेच्या दडपणाखाली व खुर्चीच्या हव्यासापोटी चीटकून आहेत. त्यांचा वापर कठपुतली सारखा येथील प्रस्थापित गब्बर करून घेतात पण हे कुणाच्या लक्षात येते ?
गेल्या एक दोन वर्षापासून गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील उपोषण ,आंदोलन करून संघर्ष करीत आहेत. गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळावे हे मान्य आहे. तो त्यांचा नैर्गिकदृष्टया हक्क आहे. पण आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे यामुळे येथे आज संघर्ष पेटला .आणि दोन्ही समाजात अराजकता निर्माण झाली. गाव पातळीवर ओबीसी मराठा मध्ये वैमनस्य निर्माण झाले. हा सर्व प्रकार कुठं तरी थांबला पाहिजे . म्हणून समाजभान लक्षात घेऊन, महाराष्ट्राला मोठ्या दंगली पासून वाचविण्यासाठी श्रद्धेय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी कश्याचीच पर्वा न करता त्वरित पत्रकार परिषद घेऊन दिनांक २५जुलै २०२४ पासून चैत्यभूमी दादर , मुंबई येथून “आरक्षण बचाव यात्रा” केली या आरक्षण बचाव यात्रेचा हेतू असा आहे की शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी शिवाय शांतता कोणीच प्रस्थापित करू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आज सर्व महाराष्ट्रात भीतीचे वातावरण आहे. यामुळे समाजात स्फोटक वातावरण झाले आहे. ते अजून होऊ नये ते शांत कसे करता येईल आणि गावगाडा पूर्ववत होईल या साठी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा आयोजित केली होती. मराठा , ओबीसी यांच्या आरक्षणावरून समाजात उफाळून आलेली अराजकता थांबवावी या साठी आरक्षण यात्रा गतिमान करण्यात आली. आणि सर्व आरक्षणवादी नेते यांना श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः त्यांना निमंत्रणे दिली की या नेत्यांनी आपली भूमिका मांडून समाजात सलोखा निर्माण करावा पण लक्षात कोण घेते ? म्हणून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली. या यात्रेचे उद्देश त्यांनी स्पष्ट केले ते पुढील प्रमाणे
१) ओबीसी चे आरक्षण वाचले पाहिजे
२) एस सी , एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे.
३) ओबीसींच्या विद्यार्थ्याना सुद्धा एस सी , एस टी प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशीच लागू झाली पाहिजे.
४) एस सी , एस टी आणि ओबीसी ला पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे .
५) १०० ओबीसी आमदार निवडून आणणे
महात्मा फुले, शाहु महाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उद्धारासाठी दिलेलं आरक्षण शाबूत राहण्यासाठी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लखलखत्या विजांच्या कडकडाटासह उन वारा पाऊस धारा डोक्यावर झेलून चिखलाने माखलेले रस्त्यातून मार्ग काढून तुमच्या आमच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढली . ती का ? व कश्यासाठी हे आता तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. कारण हा आपल्या जीवन मरणाचा प्रसंग आहे. की आमच्या हक्काचं आरक्षण टिकलं पाहिजे या साठी ही यात्रा , स्वतः बाळासाहेब महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहचून शरीराची पर्वा न करता सांगत होते की तुमचं आरक्षण धोक्यात आहे. म्हणून त्यांच्या आवाजाला ओ देणे हे आपले कर्तव्य आहे. माझ्या बांधवांच्या हक्काच्या आरक्षणाचं रक्षण झालं पाहिजे तसेच गाव गाड्यात निर्माण झालेला ताण तणाव शांत होऊन येथील माणूस हा बंधुत्वानं जगला पाहिजे . ही या मागची भूमिका आपल्याला दिसून येते .
आरक्षण बचाव यात्रा मध्ये बाळासाहेबांनी प्रत्येक जातीतील ओबीसी बांधवांना सोबत घेऊन त्यांच्या व आमच्या श्रद्धास्थान असलेल्या महापुरुषांना संताना वंदन केले व भरून आलेले अराजक्तेचे आभाळ पळून गेले हे मात्र नक्की आणि येथील भयभीत झालेल्या माणसाला ठासून सांगितले की “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!”
पण माझ्या ओबीसी बांधवांनो हा लढा जागृत ठेवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब यांनी आपल्यावर प्रचंड जबाबदारी सोपविली आहे. ती म्हणजे ओबीसी चे १०० आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. याच बरोबर उरलेल्या ५४ जागी एस सी , एस टी चे आमदार निवडून द्यायचे आहेत. या साठी प्रत्येकानी एकमेकाला सहकार्य करणे ही काळाची गरज आहे . नाही तर आपल्या घासातील घास गेला म्हणून समजा , यासाठी येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. म्हणून माझ्या एस सी एस टी आणि ओबीसी बांधवांना पुन्हा नम्र आवाहन आहे की तुमच्या डोक्यातील मेंदू हा तुमच्याच डोक्यात ठेवा दुसऱ्याचा उसना मेंदू घेऊ नका आणि वंचित बहुजन आघाडीला सत्तेत पाठवा
कारण श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वयोमानानुसार त्यांची धडपड आपण समजून घ्या त्यांच्या पहिल्या हाकेला ओ दया आणि आपल्या पीढीला समृद्ध करा तरच आपले आरक्षण वाचेल नाही तर आपले मागचे गुलामीचे दिवस पुढे यायला जास्त दिवस लागणार नाहीत. म्हणून आपलं मत वाया जाईल या गोड विषाला बळी पडू नका , कोणत्याही पक्षाच्या आमिषाला बळी न पडता कोणत्याही भुलथापाना भुलून जाऊ नका वंचित बहुजन आघाडीला येत्या विधान सभेत मतदान करून सहकार्य करा व आपल्या हक्काचे सरकार प्रस्थापित करा म्हणून श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक राजकारण समजून घेणे आज काळाची गरज आहे.
बाळासाहेबांना साथ देऊया
हक्काचे आरक्षण वाचवूया
-देवानंद पवार



