लातूर दि – औसा येथील आमदाराने फक्त पैसा कमावण्याचा व्यवसाय केला आहे. एक कंपनी होती आता तब्बल १९ कंपन्या आहेत. जम्मू काश्मीर मध्ये कंपनी आहे असा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिनकर माने यांनी केला.
2019 ला आदेश दिला म्हणून युतीधर्म पाळला. बेइमानी केली नाही, आमदाराला निवडून आणले. पण त्यांनी बेइमानी केली. जनतेसाठी काही केले नाही. सध्या एकच धंदा सुरू आहे, काम देतो गळ्यात आमचा गमजा घाला. लातूर चे चमचे औश्यात आले आहेत. पुर्वी फक्त दोन एकर शेती होती, एक अॅग्रो कंपनी होती. आता 19 कंपन्या आहेत. थेट जम्मू काश्मीर मध्ये कंपनी काढली आहे असे दिनकर माने यांनी सांगितले. तेव्हा त्यासाठीच 370 कलम हटविले आहे असे उध्दवजी यांनी सांगितले. आमदाराने फक्त पैसा कमावण्याचा व्यवसाय केला आहे. किल्लारी साखर कारखान्यांवर 100 कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केला असल्याचे ही दिनकर माने यांनी सांगितले.







