• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

पांडुरंगाच्या महाराष्ट्रात प्रचाराच्या वारीसाठी आलो याचा आनंद – सुपरस्टार पवनकल्याणजी

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
November 17, 2024
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर/प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी राजांची ही भूमी आहे. ही संतांची भूमी आहे,ही वीरांची भूमी आहे.या सर्वांना नमन करण्यास मी आलो आहे. पांडुरंगाच्या वारीचा हा महाराष्ट्र आहे.या महाराष्ट्रात प्रचाराच्या वाढीसाठी येता आलं याचा मला आनंद होत आहे,अशा अस्खलित मराठी वाक्यातून बोलत दक्षिणात्य सुपरस्टार, जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी यांनी लातूरकरांची मने जिंकून घेतली.
     लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासाठी पवनकल्याणजी यांनी लातुरमध्ये रोड शो केला. त्यानंतर महात्मा गांधी चौकात आयोजित सभेत पवनकल्याणजी बोलत होते.माजी खासदार अमर साबळे,डॉ.सुनिल गायकवाड, उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर,शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे,महिला मोर्चाच्या अध्यक्षा रागिनीताई यादव, गुरुनाथ मगे,शैलेश गोजमगुंडे, दिग्विजय काथवटे,गणेश गोमसाळे,प्रविण कस्तुरे आदींसह मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
     या भूमीला नमन करण्यासाठी मी आलो आहे. लाडक्या बहिणी आणि भावांनाही प्रेमपूर्वक नमस्कार, अशा शब्दात पवनकल्याण यांनी आपले भाषण सुरू केले.मी मराठी भाषेचा सन्मान करतो. त्यामुळे मराठी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.माझे उच्चार चुकले तर मला क्षमा करा,असेही पवन कल्याणजी म्हणाले.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा मी आभारी आहे.त्यांनीच मला या भूमीत येण्याची संधी दिली.परंतु फक्त मते मागण्यासाठी मी आलो नाही.वीरांच्या भूमीला नमन करण्यासाठी येथे आलो आहे. छत्रपती शिवरायांच्या या भूमीने लढण्यास शिकवले.मला स्वराज्याचा अर्थ शिकवला. जिजाऊ मातेच्या संस्कारांची ही भूमी आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे या भूमीला मी नमन करतो,असेही ते म्हणाले.
       भारतीय जनता पक्ष व स्व.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आणि माझा जनसेना हा पक्ष संपूर्णपणे जनतेसाठी समर्पित आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना भेटणे मला शक्य झाले नाही.पण त्यांच्याकडून मला लढण्याची प्रेरणा मिळाली.आपल्या राज्याच्या हितासोबतच राष्ट्राचेही हित साधले पाहिजे हा सिद्धांत मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो,असा आदरपूर्वक उल्लेख पवन कल्याणजी यांनी केला.


      केंद्रातील सरकारने मागील १० वर्षात राम मंदिर व ३७०  कलम हटवण्यासारखी मोठी कामे केली.भारताचा तिरंगा आज जगात ताठ मानेने उभा आहे.राष्ट्रीय महामार्गाचे जाळे देशभर झाले.सरकारने २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले.शेतकऱ्यांना विविध योजना लागू केल्या.त्यामुळे मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जोडला गेलेला आहे.केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राज्यातील महायुती सरकार याच विचाराने काम करत आहे. छत्रपती शिवाजी राजांनी आदर्श स्थापित केले,साहस केले त्यामुळे ते प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांची विचारधारा विशेष आहे. महाराष्ट्रधर्म म्हणून ती ओळखली जाते.राज्यातील सरकार शिवरायांच्या विचारावरच चालत असल्याचे पवनकल्याणजी यांनी सांगितले.लातूर तिरूपती विमानसेवा व रेल्वेसाठी प्रयत्न करण्याचे  आश्वासनही त्यांनी दिले.
   माजी खासदार अमर साबळे म्हणाले की,पवन कल्याण हे हिंदुत्वाचा चेहरा आहेत म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना आंधी असे म्हणतात.”पवनकल्याण आंधी है,लातूर मे काँग्रेस का सुपडा साफ करना बाकी है”, असेही साबळे म्हणाले.
    यावेळी मनोगत व्यक्त करताना उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, लातूरची तरुणाई आणि सामान्य जनता भाजपाच्या मागे उभी आहे.लातूरकरांच्या प्रेमामुळेच नियोजित नसतानाही पवन कल्याणजी यांनी रोड शो केला. हे प्रेम असेच कायम राहू द्या,असे आवाहन करत लातूरहून तिरुपतीसाठी रेल्वे सुरू करून बहिणीला भेट द्यावी,अशी मागणी डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केली.


    उत्साही तरुणांचा जल्लोष… दक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांचे प्रसिद्ध संवाद ऐकण्यासाठी तरूण इच्छुक होते.त्यांच्या गीतांवर ठेका धरणारी तरुणाई असे काही संवाद ऐकण्यासाठी, पवन कल्याणजी यांनी असे संवाद म्हणावेत अशी मागणी वारंवार करत होती.या तरुणांना पवन कल्याणजी यांनीही नाराज केले नाही.भाषणात काही वेळा तेलगू वाक्य उच्चारत त्यांनी तरुणांचा उत्साह द्विगुणित केला.

 जय महाराष्ट्रने सांगता…
    पवन कल्याणजी यांनी संपूर्ण भाषण मराठीत केल्यानंतर ‘जय महाराष्ट्र’ने भाषणाची सांगता केली.तरुणांनी आग्रह केल्यामुळे “बाय-बाय अमित” लिहिलेले पोस्टर त्यांनी पुन्हा एकदा हातात घेऊन उंचावले.अर्चनाताईंच्या विजयासाठी बाय-बाय अमित भाई,अमित बाय-बाय असेही ते म्हणाले.

Previous Post

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

Next Post

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत”आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र युवा संवाद”

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत"आयडिया फॉर विकसित महाराष्ट्र युवा संवाद"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved