
लातूर – बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वा च्या निमित्ताने वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे बुद्ध वंदना कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपासक-उपासिकांच्या वतीने तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प व पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदनेनेकार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाद्रपद पौर्णिमेचे महत्त्व विशद करताना केशव कांबळे म्हणाले की भाद्रपद पौर्णिमेच्या दिनीच प्रजापती गौतमी पाचशे शाक्य स्त्रियांसह कपिल वस्तू हुन खडतर प्रवास करून दीडशे मैलचेअंतर चालून वैशाली येथे जाऊन भिक्खु आनंदाच्या मदतीने भिकखुनी संघात सामील होण्याची विनंती केली तेव्हा भगवान बुद्धाने स्त्री-पुरुष समतेच्या विचारातून प्रजापती गौतमीसह पाचशे स्त्रियांचा भिक्खुनीसंघ स्थापन करून स्त्री पुरुष विषमतेला गाडून स्त्री-पुरुष समतेचा विचार या देशात पहिल्यांदा मांडला. म्हणून भाद्रपद पौर्णिमा ही खऱ्या अर्थाने स्त्रियांचा सन्मान करणारी ठरते असे नमूद केले

पुढे बोलताना केशव कांबळे म्हणाले की भगवान बुद्ध हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कारते ठरले राजा प्रसेनजित हा मुलगी झाल्याचे कळतातच खिन्न झाल्याचे पाहून भगवंतांनी खिन्नतेचे कारण राजाला विचारले तेव्हा राजा म्हणाला भगवान मला कन्यारत्न झाले. तेव्हा भगवंत म्हणाले राजा पुत्रापेक्षा कन्याही कधीही श्रेष्ठ असते ती सद्गुनी , कन्या ,पत्नी ,माता आशा भूमिका साकारणारी असून पराक्रमी पुरुषांना जन्म देणारी असते असा उपदेश करून मनाला सन्मार्गावर लावून प्रजाजनावर जुलुम न करता प्रेम आणि करुनेने राज्य करावे असा उपदेश केला म्हणून भगवान बुद्धाचा स्त्री सन्मानाचा, प्रेम व करुणेचा विचार धारण करून सन्मार्गांनी माणसाने जगावे हा बुद्ध विचार समाजात रुजण्यासाठी बुद्ध विचाराचे श्रवण करून माणसाने सुखी व्हावे असे आपल्या सविस्तर मनोगतात व्यक्त केले. या कार्यक्रमात राशन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या. राजू कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

