पवनकल्याण यांचा लातुरात अभूतपूर्व रोड शो
अफाट गर्दीकडून ताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब


लातूर/प्रतिनिधी: ते आले… त्यांनी पाहिलं…. आणि त्यांनी जिंकलं… या केवळ तीनच शब्दात वर्णन करावं असा अद्भुत रोड शो लातूरकरांनी शनिवारी अनुभवला,लातुरच्या इतिहासात कधीही झाली नाही एवढी गर्दी जनसेना पक्षाचे अध्यक्ष,आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांना पाहण्यासाठी लातुरच्या रस्त्यावर उतरली. या रोड शोमुळे लातूर शहर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
प्रचंड घोषणा,प्रत्येक इमारतीवरून होणारी पुष्पवृष्टी, चमकणारे कॅमेऱ्याचे फ्लॅश, मोबाईल मधून चित्रीकरण करण्यासाठी,फोटो काढण्यासाठी गर्दी झालेली गर्दी, प्रचंड उत्साह,हे या रोड शोचे वैशिष्ट्य ठरले.
सजवलेल्या वाहनात लातुरकरांचे अभिवादन स्वीकारणारे पवनकल्याणजी, खा.अमर साबळे आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना पाहण्यासाठी गर्दीने खचाखच भरलेल्या रस्ता, दुकानातून ओसंडून वाहणारी माणसं,प्रत्येक इमारतीच्या गॅलरीत,छतावर आणि खिडक्यातून हात हलवणारे नागरिक असं चित्र गंजगोलाई पासून महात्मा गांधी चौकापर्यंत पहायला मिळालं.
कधी दोन्ही हात जोडत,कांही वेळा हात उंचावून अभिवादन करत,कमरेपासून झुकून नागरिकांच्या प्रेमाचा वर्षाव स्वीकारत पवनकल्याजी व डॉ.अर्चनाताईंचा हा रोड शो मार्गक्रमण करताना तेवढ्याच उत्साहात घोषणा देणारे हजारो तरुण हे चित्र हे दिसलं.वाद्यांचा गजर,डॉल्बीचा दणदणाट आणि त्या जोडीला एकाच दिशेने वळलेल्या सर्वांच्या नजरा असं या रोड शोचं वर्णन करावं लागेल. जागोजागी हस्तांदोलनासाठी होणारी गर्दी,पुष्पहार घालण्यासाठी वाहनावर चढणारे उत्साही तरुण रोड शो मध्ये पहायला मिळाले.
तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत असताना वृद्ध नागरिक व महिलाही हा क्षण आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी गर्दीत उभ्या असल्याचे दिसून आले.
विनम्रतेने सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार करत सुपरस्टार पवनकल्याणजी व डॉ.अर्चनाताई पाटील यांनी लातुरकर मतदारांना साद घातली.
चौकट …
काँग्रेस भावनातून अभिवादन..
रोड शो मुख्य रस्त्यावरून पुढे जात असताना दोन्ही बाजूंनी होणाऱ्या अभिवादनाचा स्वीकार मान्यवर करत होते.प्रत्येक इमारतीच्या छतावर नागरिक होते.त्यांच्याही अभिवादनाचा स्वीकार पवन कल्याणजी व अर्चनाताई करत होते.रोड शो काँग्रेस भवनासमोर आल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत असणाऱ्या मंडळींनीही हात हलवून अभिवादन केले. दोघांनीही त्यांना हात जोडून नमस्कार करत त्याचा स्वीकार केला.यावेळी उत्साहित झालेल्या तरुणांनी महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. “एकच गर्जना, पाटील अर्चना” ही घोषणा कॉंग्रेस भवनासमोर दुमदुमली.

वारं फिरलं….
पवार कल्याणजींचा रोड शो पाहण्यासाठी,त्यात सहभागी होण्यासाठी हजारो नागरिक व तरुण उत्सुक होते.रोड शो सुरू झाल्यानंतर झालेली अफाट गर्दी पाहता लातूर मतदारसंघातून डॉ.अर्चनाताई पाटील यांच्या दिशेने वारं वाहत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून सहजच उमटत होत्या. “लातुरचं वारं आता फिरलंय ” असं जो- तो म्हणत होता.यामुळे डॉ. अर्चनाताईंचा विजय स्पष्ट झाल्याचे दिसून आले.

महापुरुषांचे फोटो रोड शो मध्ये..
लातूरकरांनी महापुरुषांचे फोटो पवनकल्याणजी व डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हाती दिले.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह मान्यवरांच्या फोटोंना हातात घेत दोघांनीही त्यांना नमन केले.
बाय-बाय अमित….
विविध फोटो हातात घेऊन पवनकल्याणजी व ताई अभिवादन करत असताना रोड शो मध्ये सहभागी झालेल्या काही तरुणांनी ‘बाय-बाय अमित’ असे लिहिलेला फलक त्यांच्या हातात दिला.फलकावरील वाक्य वाचून पवनकल्याणजी यांनी तो उंचावून दाखवताच पुन्हा एकदा प्रचंड घोषणांनी आसमंत दुमदुमलं.

