व्यवहारवादी जगामध्ये आपल्या स्वतःचं आणि आपल्या विचाराचं अनुकरण करणारच आपला खरा अनुयायी होवू शकतो हेच आपण विसरून बसलेलो आहोत… मी आणि माझं जगणं यावर विचारकरायलाही आपणाला आज वेळ नाही… ! मी स्वतः काय आहे ,काय करतोय,जगतोय का जगाच्या रहाट गाड्यात आपला घाण्याचा बैल झालाय,हे ओळखण्यासाठी आपण स्वतः एक दिवस वेळ काढून “सेवालय ” किंव्हा ” रूद्र हट” वरती घालवायला हवा तेंव्हा आपल्या डोक्यातील धुंदी जायला 24 तास लागतील . परंतु तेंव्हा तुमच्या डोक्यात जे इंडिकेटर लागतील ते तुम्हाला खऱ्या जगण्याच्या वाटेवर घेऊन जातील एवढं मात्र नक्की… निमित्त ठरलं महारुद्र सरांच्या निमंत्रणानुसार शिरूर ताजबंदला जायचं, तसं पाहता वर्षभरात अनेक कार्यक्रमाचे निमंत्रण येतात कित्येक कार्यक्रमाचं निमंत्रण सहज विसरून जातो आनेकवेळा कित्येकांच्या लग्नाला जाण्याचं निमंत्रण विसरतो. परंतु रुद्राहट वरती कार्यक्रम असला तर त्याची उत्सुकता कायम लागलेले असते एक डिसेंबर रोजी रुद्र हटवर्ती यायला हवं असं महारूद्र सरांनी फोन वरती सांगितलं आणि तेव्हापासून एक डिसेंबरला आपणाला शिरूर ताजबंदला जायचं हे मनी पक्के केलं. सोबत मित्र येणार असल्यामुळे चार चाकीची सोय होणार हे नक्की होतं परंतु ऐनवेळी त्यांचे कार्यक्रम बदलले आणि मला शिरूर ताजबंद ला जाण्याची सोय उपलब्ध होईना… तेव्हा सहसा करत नाही असा एसटीचा प्रवास करत मी शिरूर ताजबंद ला पोहोचलो आणि नियती असते ती अशीच बस स्थानकावरून उतरलो आणि शिरूर मध्ये महारुद्र सरांच्या नंतर त्यांचे शेजारी शेतकरी हे माझ्या ओळखीचे ते दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला जात होते त्यांनी मला पाहिलं आणि मी त्यांना न विचारता त्यांच्या गाडीवरती बसलो ते म्हणाले सरांच्या शेतात निघालात का आणि ते ज्या कामासाठी निघाले ते सोडून त्यांनी मला सरांच्या शेतात सोडलं हा योगायोग म्हणजे नियतीचाच खेळ आहे की काय असे मला वाटून गेलं… परंतु काहीही असो या परिसरात गेलो आणि जगरहाटीच्या बाहेर आपण कुठेतरी अशा ठिकाणी येऊन एक वेगळी ऊर्जा घेऊन जाणे गरजेचे आहे असे मनोमन वाटून गेले… महिनाभर अगोदरच येळवशीला मिळणारे खद्य पदार्थ यावेळी मनसोक्त खाल्ले गव्हाची खीर आणि तूप दोन वेळा आवर्जून घेतलं हा आसा अंगी लागणारं गावर मेवा कधीतरीच वाट्याला येतो आणि ही संधी मी सोडू शकत नव्हतो… बाहेर कुठे ही कितीही पैसे दिले तरी हा मेवा तुम्हाला उपलब्ध होणार नाही. कारण ही बनवण्याची रेसिपी आता तुरळकच ठिकाणी अनुभवायला मिळत आहे… कालांतराने लोप पावेलकी काय आशी भीतीही रेडिमेड व धाबा आणि हॉटेल संस्कृतीमुळे वाढली आहे…आसो… या निमित्ताने एक प्रकाशन सोहळा अनुभवता आला निमित्त होतं ” रुद्राहटचा हर्ष” या महारुद्र सरांच्या पुस्तक प्रकाशनाचे या मेळाव्याला आलेले सर्वच या पुस्तकाचे प्रकाशित होते. या वेळेला सर्वांना हे पुस्तके गिफ्ट मिळालं. मी अनेक वेळा मला आवडलेलीचं पुस्तकं सलग वाचून काढलेली आहेत, त्यात या पुस्तकाचे नोंद झाली. लिहिण्यासाठी बरेच डोक्यामध्ये आलं होतं परंतु ऐनवेळी नेमकं काय माझ्या हातून लिहिले गेले हे मलाही माहित नाही परंतु एक मात्र नक्की श्यामच्या आईच्या गोष्टी हे वाचल्यानंतर मुलांना नकळत आपण स्वतः शाम असल्याचं पुस्तक वाचताना वाटतं तसाच अनुभव हर्ष आणि ताईच्या कृतीतून हर्षवर होणारे संस्कार पाहून वाटले. महारुद्र सरांनी “हर्षची ताई” या गोष्टी लिहाव्यात ही इच्छा “रुद्राहट चा हर्ष” वाचताना मनोमन निर्माण झाली… ही या फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून या ठिकाणी नोंदवत आहे… खरंच माणसाला आनंदी जगायचं असेल तर त्यांनी महारुद्र सरांच्या फेसबुकच्या पोस्ट जरी वाचल्या आणि त्यापैकी दहा टक्के जरी जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर माणूस आनंदी कसा जगू शकतो याचे उदाहरण जगामध्ये सर्वांनाच अनुभवता येईल एवढे या ठिकाणी नोंदवतो आणि थांबतो…. दिपरत्न
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...