
खरेदी केंद्रावरील सोयाबीनची खरेदी दुपारपासून झाली बंद; शेतकरी आक्रमक, शेतमालाची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी करून शेतकऱ्यांनी मांडलाय ठिय्या
नाफेडच्या वतीने लातूर शहरातील गूळ मार्केट परिसरातील खरेदी केंद्रावर सुरू असलेली हमीभावाने सोयाबीनची खरेदी दुपारपासून अचानक बंद करण्यात आलीय. यामुळे सोयाबीन विक्रीसाठी शेतमालाच्या वाहनांसह प्रतीक्षेत असलेले नोंदणीकृत शेतकरी आक्रमक झाले असून, या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरून आपली शेतमालाची वाहने काढून सरळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्याठिकाणी ठिय्या मांडलाय…. शेतकऱ्यांनी आपली शेतमालाची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर उभा करून ठिय्या मांडला आहे. या आंदोलनात शेतकरी संघटना आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत सोयाबीनची खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय.

