• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

मसलगा येथे गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात विविध योजनांविषयी मार्गदर्शन

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
September 18, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

युवक-युवतींनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून स्वतःचा उद्योग, व्यवसाय उभारावा- जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे

लातूर, दि. १८ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ‘लोकसंवाद २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत निलंगा तालुक्यातील मसलगा येथे विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी युवक-युवतींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती दिली, तसेच या योजनेतून स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मसलगा येथील नारीशक्ती गणेश मंडळ येथे गुरुवारी आयोजित या कार्यक्रमाला या उपक्रमात कृषि विभाग, जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. मसलगा गावातील सर्व गणेश मंडळांना एकत्रित करून लोकसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गणेश शेळके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, उपकृषी अधिकारी सुनील घारोळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, पोलीस पाटील संतोष नरहरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष तोरखडे, हरिदास साळुंके, संभाजी पाटील, राजकुमार सोनी यांची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अर्थसहाय्य देत आहे. ५० लाख ते १ कोटी रुपयेपर्यंतच्या प्रकल्पासाठी १७ लाख ५० हजार पर्यंत अनुदान देण्यात येते. १ लाख ते १ कोटी पर्यंतच्या कोणत्याही प्रकल्पासाठी या योजनेचा लाभ घेता येतो, असे जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी केले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मधाचे गाव या योजनांची माहिती दिली.

कृषी अधिकारी सुनील घारोळे यांनी कृषि विभागाच्या महाकृषी विस्तार एआय ऍप, एफएफएस ऍप आणि महाडीबीटीच्या माध्यमातून कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन केले.

प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी माहिती व जनसंपर्क विभागामार्गत आयोजित उपक्रमाबाबत माहिती दिली.

यावेळी मसलगा येथील नारीशक्ती गणेश मंडळ, शंभुराजे प्रतिष्ठान गणेश मंडळ, नवयुवक गणेश मंडळ, बालगणेश मंडळ, संभाजीराजे गणेश मंडळ, जयभवानी गणेश मंडळ, तुळजाभवानी गणेश मंडळ, युवा उद्योजक गणेश मंडळ, इंदिरानगर गणेश मंडळ आदी गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी माधव शिंदे, योगेश पाटील, दत्ता जाधव, नारीशक्ती गणेश मंडळांच्या अध्यक्ष सौ. आरती तुळशीदास साळुंके, सचिव राधिका राजेंद्र पिंड, इतर गणेश मंडळाचे महेश मोहिते, श्रीप्रसाद पाटील, महेश पारवे, अमन शेख, मेघराज पाटील, सचिन पवार, अविनाश आरेराव, सुरेश तोरखडे, अक्षय देशमुख, कृष्णा कुलकर्णी, विशाल पाटील, सागर पाटील, माधव लव्हरे, ओमकार जाधव, श्रीकांत जाधव, अभिषेक शिंदे, सचिन कांबळे, पुरूषोत्तम शिंदे, किशोर शिंदे, संकेत तेलंगे, शेखर गिरी, सिध्दार्थ पवार आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रमेश शिंदे यांनी केले. तर प्रास्ताविक रविकिरण सूर्यवंशी यांनी केले.


Previous Post

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

Next Post

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

September 19, 2026

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

September 18, 2026

मसलगा येथे गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात विविध योजनांविषयी मार्गदर्शन

September 18, 2026

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

September 18, 2026

Recent News

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

September 19, 2026

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

September 18, 2026

मसलगा येथे गणेशोत्सवानिमित्त ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात विविध योजनांविषयी मार्गदर्शन

September 18, 2026

महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रूजू

September 18, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

September 19, 2026

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

September 18, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved