• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

एमएसआरडीसीच्या विकासकामांवर अनिलकुमार गायकवाड यांची विशेष मुलाखत

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
September 19, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘जय महाराष्ट्र’मध्ये २२ सप्टेंबरला, ‘दिलखुलास’मध्ये १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्रसारण

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक, दर्जेदार आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्यावर शासनाचा भर असून, राज्यातील विविध महत्त्वाकांक्षी रस्ते व दळणवळण प्रकल्पांना वेग देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी विविध प्रकल्पांची सद्यःस्थिती, प्रगती आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमध्ये श्री. गायकवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.

याशिवाय ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून १९ ते २४ सप्टेंबर २०२६दरम्यान सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ ॲपवर ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.

महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती

मुलाखतीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू आणि पुणे रिंग रोड यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या प्रगतीबाबत श्री. गायकवाड यांनी माहिती दिली.

**‘विकसित महाराष्ट्र २०४७’**च्या दृष्टिकोनातून एमएसआरडीसीच्या आगामी नियोजनाची माहिती देताना त्यांनी रस्ता सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि संतुलित प्रादेशिक विकास या बाबींना विशेष महत्त्व असल्याचे स्पष्ट केले.

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूमुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्थेला मिळणारी गती, तसेच पुणे रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास होणारी मदत याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

भविष्यातील शहरांच्या नियोजनावर भर

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची भूमिका स्पष्ट करताना नव्या शहरांच्या विकास आराखड्यांमध्ये भविष्यातील पायाभूत सुविधांच्या गरजांचा विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध विभागांमध्ये संतुलित आणि नियोजित विकास साधण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

समृद्धी महामार्गावर हरित ऊर्जेचा वापर

पायाभूत सुविधांच्या विकासासोबत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले जात असून, समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेसह हरित ऊर्जेचा वापर करण्याचे नियोजन असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

रस्ते विकासाबरोबरच रस्ता सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम आणि निर्धारित वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले.

महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाचा वेग, पायाभूत सुविधांचे नियोजन, पर्यावरणपूरक विकास आणि रस्ता सुरक्षा यांसह एमएसआरडीसीच्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबतची माहिती या विशेष मुलाखतीतून नागरिकांना मिळणार आहे.

Previous Post

फक्त मानवता! ‘जयंती २’ : आरक्षणाच्या प्रश्नापलीकडे सामाजिक न्यायाचा आरसा….

Next Post

‘महाविस्तार एआय’ ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर – सूर्यकांत लोखंडे

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

'महाविस्तार एआय' ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर - सूर्यकांत लोखंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026

‘महाविस्तार एआय’ ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर – सूर्यकांत लोखंडे

September 21, 2026

Recent News

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

कृषी सेवारत्न पुरस्काराबद्दल सूर्यकांत लोखंडे यांचा सत्कार

September 21, 2026

‘महाविस्तार एआय’ ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर – सूर्यकांत लोखंडे

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved