
धुळीत माखलेल्या बायांना जेव्हा अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळेल तेव्हा जागतिक महिला दिन साजरा होईल त्यासाठी सर्व महिलांना व्यक्त होणे लिहिते होणे आवश्यक आहे. जेव्हा त्या लिहू लागतील बोलू लागतील तेव्हा क्रांती घडून येईल. कारण चार ओळी लिहिण्यासाठी विचारांची गरज असते. त्याच विचारावर क्रांतीची मशाल पेटली जाते असे प्रतिपादन पोलादी बाया पुस्तकाच्या लेखिका दिपा पवार यांनी व्यक्त केले. सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्था व दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद च्या सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दीपा पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद कल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, सनराईज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नंदिनी पडिले ,सामाजिक पर्यावरण कार्यकर्ते तज्ञ सुपर्ण जगताप, प्राचार्य क्रांती सातपुते, प्राचार्य प्रशांत मन्नीकर, प्राचार्य पूनम नाथानी ,उपप्राचार्य अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ अंजली जोशी यांनी केले.
तर सनराईज संस्थेचे अध्यक्ष नंदिनी पडिले यांनी त्यांचा संघर्षमे जीवन प्रवास आणि पौलादी बाया हे पुस्तक वाचल्यानंतर लेखिकेचा प्रवास वाचून प्रभावित होऊन हा कार्यक्रम घेण्याचे मनाशी पक्के ठरवले होते असे सांगितले. तर सुपर्ण जगताप यांनी दीपक पवार यांचा संघर्ष आणि कार्यक्रम घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षीय समारोप मध्ये प्राचार्य शिवाजी गायकवाड म्हणाले हा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी खूप गरजेचा आहे आणि त्यामुळे अशी व्याख्यान होणे जरुरी आहे असे सांगितले.

पोलादी बाया म्हणून महिलांची ओळख होणे आवश्यक आहे . दिपा पवार म्हणाल्या शेवटच्या बँच वर बसणारे कुल वाटतात ,मस्ती करणारे वाटतात पण खरंतर तेच क्रांती करतात. भटक्या जमातीतील मुले शाळेतील शेवटच्या बँच वर बसलेली असतात. पण सामाजिक योगदानामध्ये त्यांची क्रांती महत्त्वाची असते. महिलांची ओळख ही भावनिक न होता पोलादी बाया अशी निर्माण होणे ही काळाची गरज आहे.

नैसर्गिक रित्या बाळाला दूध पाजणे यातच खरे ज्ञान सामावलेले आहे. लाजेचा शोध घेण्यासाठी माझा प्रवास नसून नारीच्या नेतृत्वात अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्यासाठी माझा प्रवास आहे. पोलादी बाया हे पुस्तक वेदना आणि यातना यासाठी नसून कणखरपणाचे प्रतीक आहे असेही ते यावेळी म्हणाल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपरत्न निलंगेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्य डॉ अशोक नारनवरे , प्रा दशरथ भिसे, प्रा पंचशील डावकर , डॉ बी आर पाटील ,गणेश माशाळकर, डॉ सितम सोनवणे, श्याम जैन, डॉ गणेश गोमारे , आझम शेख यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमासाठी सनराईज सामाजिक संस्थेच्या महिला सदस्य सामाजिक कार्यकर्ते दयानंद शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांचे योगदान मिळाले.

