
लातूर शहरातील बोधे नगर परिसरात मोठ्या कुत्र्यांकडून लहान कुत्र्यांवर हल्ला होऊन त्यात त्याच्या बळी जाण्याची सलग दुसरी घटना आज (दि 12 मार्च) या दिवशी घडली आहे. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेबाबत.
लातूर महानगरपालिकेने या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांच्या लसीकरणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. तसेच, नागरिकांनीही सतर्क राहून आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक तेथे स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशासनाने कुत्र्यांच्या निर्बंधासाठी विशेष मोहीम राबवावी आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील कुत्र्यांच्या हालचालींबाबत माहिती द्यावी. यामुळे लातूर शहरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि अशा घटनांना आळा बसेल.
काही दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी एका आपारमेंट मध्ये अशाच कुत्र्याच्या गॅंगने एका महिलेवरती हल्ला केल्याचं चित्र सोशल मीडिया वरती व्हायरल झालं होतं.लातूर शहरात आंबेजोगाई रोड परिसरात यशोदा टाकीच्या समोर एका वृद्धाला अशाच कुत्र्याच्या समाने चावा घेऊन प्रचंड जखमी केलं होतं दरम्यान लातूर शहर महानगरपालिका एखाद्या मनुष्याचा बळी गेल्यानंतरच जागे होणार का असा संतप्त सतवाला लातूरकर करत आहेत…

