दयानंद कला संगीत विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

लातूर दि. १३ सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे अशा या युगात एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वार्थ सोडून राष्ट्र सेवेसाठी ज्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी आहेत त्याची निवड करावी असे प्रतिपादन दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाचे माजी विद्यार्थी व सोलापूर येथे कार्यरत असलेले सीआयडी ऑफिसर शिवशंकर बिराजदार यांनी केले. ते दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या इयत्ता बारावी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
पुढे श्री बिराजदार म्हणाले की, ” भारतीय सैन्यदल,पोलीस अधिकारी, गुप्तचर विभाग, निमलष्करी दल यात अनेक करिअरच्या संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजसेवा व राष्ट्रसेवा करून आयुष्याचे सार्थक करावे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड हे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना ते म्हणाले की , “दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभाग हा केवळ संगीत क्षेत्रातील विद्यार्थी घडवत नाही तर मागील २६ वर्षात या विभागाने प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील नेतृत्व घडविले आहेत. संगीत विभागातून २४ विद्यार्थी हे चित्रपट कलावंत तर २३ विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी घडले आहेत.”

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ दिलीप नागरगोजे व डॉ.संदिपान जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक डॉ.प्रशांत दीक्षित, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी प्रा.शरद पाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ममता पिंपळे हिने केले तर प्रास्ताविक कु.पौर्णिमा मस्के हिने केले पाहुण्यांचा परिचय कु. स्वाती बचाटे हिने केले तर आभारप्रदर्शन आविष्कार केसरे याने केले.

या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ.दिलीप नागरगोजे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व डॉ.देवेंद्र कुलकर्णी यांची अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबरोबरच इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्याचा व राष्ट्रीय युवक महोत्सवात यश संपादन केलेल्या अर्जुन पवार याचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश मुंडे, संजय जाधव, गणेश सरवदे, आनंदी भदाडे, रेणुका सूर्यवंशी,कल्याणी सूर्यवंशी, साक्षी मस्के, प्रांजली सोनकांबळे, आदित्य झुंझे, रागिणी बैनबोने, श्रद्धा कुंभार, आदिनाथ बन यांनी परिश्रम घेतले.

