Latest Post

✨✨ ‘घाट’ — मृत्यूच्या शांततेतून जगण्याचा आरसा दाखवणारी प्रभावी नाट्यकृती ✨.

समीक्षण: दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र कै. ग्यानोबा शिवराम कोटंबे बहु. सेवा संस्था, हिप्पळनेर प्रस्तुत... माणसाच्या आयुष्यातील जन्म-मृत्यू हा अटळ...

Read more

🌿 लातूर केंद्रावरील ६४वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा — ‘रातमतरा’ नाट्यसमीक्षा 🌿

नाट्य समीक्षा दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र लातूर केंद्रावरील राज्य नाट्यस्पर्धेच्या ६४व्या पर्वात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी रंगमंचावर सादर झालेलं ‘रातमतरा’ हे...

Read more

🌳 लातूर महापालिकेच्या परवानगीने 25 वर्ष जुन्या वृक्षाची कत्तल : पर्यावरण संरक्षण कायद्यांची उघडपणे पायमल्ली! 🌳

लातूर शहरातील बोधेनगर परिसरात तब्बल २५ वर्षांपासून उभा असलेला फिरंगी चिंचेचा प्रचंड वृक्ष एका व्यक्तीने सरळ बोडके करीत केवळ खोड ठेवत संपूर्ण...

Read more

🔴 लातूरचा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा मुद्दा ऐरणीवर!सरकारच्या आढावा बैठकीत अकोला–यवतमाळला ‘तातडी’, पण लातूरचा जीव वाचवणारा प्रकल्प का रखडतो?

मुंबई, दि. १९ – अकोला आणि यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी तत्वावर तत्काळ सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष...

Read more

🔥 लातूर–बीड शिक्षण विभागात भूकंप! शिक्षणाधिकाऱ्यावर अनियमिततेचे आरोप – शासनाचा झंझावाती निलंबन आदेश! 🔥

लातूर/मुंबई, दि. 19 नोव्हेंबर 2025शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज वीजेच्या गतीने कारवाई करत जि.प. बीडचे तत्काळीन माध्यमिक शिक्षणाधिकारी व...

Read more

दारूच्या बाटल्यांचा खच गांडूळ खत प्रकल्पात! — “आता बाटल्यांपासून खत बनवणार का?” संतप्त लातूरकरांचा सवाल…

लातूर :लातूर महानगरपालिकेच्या गांडुळ खत निर्मिती प्रकल्पात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याने लातूरकर संतप्त झाले आहेत. “कचऱ्यापासून खत बनवणाऱ्या प्रकल्पात दारूच्या बाटल्यांचा...

Read more

🎭 ‘अंतरछिद्र – द ब्लॅक होल’ : मानवी अंतःकरणाचा अस्थिर प्रकाश शोधणारे गूढ-गंभीर नाटक 🎭—

नाट्यसमीक्षण : दिपरत्न निलंगेकर संपादक दैनिक युतीचक्र लातूर महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या लातूर केंद्रावर दर्पण मराठी पत्रकार संघ, लातूरने...

Read more

घनकचरा व्यवस्थापन कामाची आयुक्त श्रीमती मानसी यांच्याकडून पाहणी

लातूर/प्रतिनिधी : शहर महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना ( बारवाल ) यांनी  स्वच्छता विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन वरवंटी कचरा डेपो...

Read more

🎭 “रे शून्य मना” — जीवन, मरण आणि चेतनेच्या शून्यापर्यंतचा अद्भुत आध्यात्मिक प्रवास 🎭

नाट्यसमीक्षण - दिपरत्न निलंगेकर, संपादक दैनिक युतीचक्र लातूर माणसाच्या जगण्यातला सर्वांत गुंतागुंतीचा विषय कोणता, तर स्वतःचे मन.सुख-दुःखाचा खेळ, इर्षांचे धिंगाणा,...

Read more

🌸 पारंपारिक वासुदेव परंपरेचे ज्येष्ठ लोककलावंत — शामराव धुर्वे यांना सादर वंदन 🌸(७७ वर्षांचा प्रवास – लोककलेच्या दिव्य परंपरेला उजाळा देणारा!)

भारतीय लोकपरंपरेच्या अखंड वाहत्या प्रवाहात “वासुदेव” ही परंपरा म्हणजे भक्ती, संगीत, काव्य, रंगवैविध्य आणि सांस्कृतिक सात्त्विकतेचा अविभाज्य आविष्कार. या परंपरेला...

Read more
Page 9 of 73 1 8 9 10 73

Recommended

गोड गळ्याची कडूबाई पंचवीस वर्षांपूर्वी कंधार आणि कर्नाटकातील काही माणसं छत्रपती संभाजी नगर येथे आली होती. त्यांनी चल म्हटले आणि मी त्यांच्यासोबत करमाड परिसरात गेलो. तिथं एका मंदिरात सुरेल आवाजात भजनं गात असलेली एक महिला होती. मी तिथं बराच वेळ घुटमळलो. कुठलीही विचारपूस न करता घरी आलो. मात्र तो आवाज कानात घुमत होता. काळाच्या ओघात मी विसरूनही गेलो.एक दशक उलटून गेले. तंत्रज्ञानाची क्रांती अफाट वेगानं समाजजीवनावर आदळत होती. त्यात अँड्रॉइड मोबाईल आले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या हातात संपूर्ण जग दिसू लागले. याच समाजमाध्यमातून एक सूर जगाच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागला, ‘माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी.‘ हे कडवं प्रत्येकाच्या जिभेवर घोळू लागलं. तो स्वर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हतं. त्या होत्या स्वरसम्राज्ञी गोड गळ्याच्या कडूबाई खरात. त्याच कडूबाईंचा संघर्ष अफाट कष्टाचा आहे.कडूबाईंचा जन्म गावकुसाबाहेर आई तान्याबाई आणि वडील तुकाराम कांबळे यांच्या घरी झाला. आवाना ता. भोकरदन जि. जालना येथे तुकाराम कांबळे हे एकतारीवर सांप्रदायिक भजनं गात आपली उपजीविका करत. त्यांच्या म्हातारपणीचं एकमेव बाळ म्हणजे कडूबाईं. निसर्गानं सुरांचं अफलातून दान जिच्या ओटीत भरभरून टाकलं, तर तत्कालीन समाजाच्या रितीने एवढ्या गोड गळ्याच्या गायिकेचं नाव कडूबाई ठेवलं. बालपणीच गाण्याचा रियाज आई वडिलांसोबत कडूबाईंनी सुरू केला. निर्गुण निराकार भजन मंडळ त्यांचे होते. त्यात ते अभंग, गवळणी, पदं, गाणी गात. त्यातून मिळालेल्या मानधनावर ते जगत, पण त्यांचा संघर्ष सुरू होता. तुकाराम कांबळे यांचं तीन माणसांचं कुटुंब कलाकार असल्याने त्यांना जात व्यवस्थेचा जाच नव्हता. मात्र दुसरीकडे याच व्यवस्थेने दमकोंडी केल्यामुळे जगण्यासाठी साधनं उपलब्ध नव्हती. म्हणून त्यांना जगण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याच काळात कडूबाईंच्या गायनाचा पाया रचला गेला. आई वडिलांनी गायलेली, लाऊडस्पिकरच्या भोंग्यातून ऐकलेली गाणी त्या तोंडपाठ करू लागल्या. ती वेगवेगळी भजनं, गाणी, अभंग, गवळणी गाऊ लागल्या. कडूबाई यांचे लग्न वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना येथील देवीदास खरात यांच्यासोबत झाले. कडुबाई आईवडिलांना एकुलती एक असल्याने देवीदास खरात तुकाराम कांबळे यांचे घरजावई म्हणून आवाना येथे आले.‌ त्यांचा संसार सुरू झाला. जे मिळेल ती कामे करू लागल्या. त्यातून त्यांचं जगणं सुरू होतं. मात्र त्यांच्या आत असलेली गायकी अस्वस्थ होती. अधूनमधून त्या वडिलांसोबत गायनाचे कार्यक्रम करत. यातच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मोठा आधार गेला. कडूबाई रोजंदारीवर काम करत करत संसाराचा गाडा हाकत होत्या. यातच देवीदास खरातही कायमच्या प्रवासाला निघून गेले. यावेळी कडुबाईंची मुलगी सहा महिन्यांची होती. घरी लहान लहान मुले, म्हातारी आई आणि स्वतः त्या. असा कुटुंबाचा भार कडूबाई यांच्यावर पडला; पण त्या डगमगल्या नाहीत. खंबीरपणे उभे राहिल्या. त्या सांगतात, ‘या काळात खूप परवड झाली. कार्यक्रम रात्री असत. त्यामुळे मुलांना घेऊन रात्री कार्यक्रम करणं जिकिरीचं होतं. म्हणून कार्यक्रम करणं बंद करून रोजंदारी सुरू केली. मात्र यात घरखर्च भागत नव्हता. यासाठी त्यांनी वडिलांची एकतारी उचलली. त्या एकतारीला घेऊन घरोघरी जाऊन गाणे गात होते. त्यातून घरखर्च भागत होता.’कडुबाई ज्या कलापथकात गात होत्या त्याच पथकातील पेटी मास्तर तेजराव सपकाळ होते. त्यांनी चिकलठाणा येथे राहत असलेल्या प्रसिद्ध लोककलावंत मीराबाई उमप यांची ओळख करून दिली. मीराबाई यांनी त्यांना सोबत घेऊन काही कार्यक्रम केले. मीराबाई उमप यांच्यासोबत त्यांनी चार पाच वर्षे गायन केले. त्या चिकलठाणा परिसरात भाड्याने राहू लागल्या. मात्र प्रत्येक कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनावर घरखर्च भागत नव्हता. मग त्यांनी एकतारीला सोबत घेत वेगवेगळ्या नगरात गात फिरू लागल्या. लोक काही प्रमाणात मदत करू लागली. लहाणपणापासून ऐकलेली गाणी तोंडपाठ करत तेच गाणे नव्या सूरात त्या गाऊ लागल्या. तो गोड आवाज सहजपणे समाजात सुगंध पेरू लागला. एक दिवस ‘आपुन खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ हे कडुबाईंच्या सुरातलं गाणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं. तिथूनच कडुबाईची फाटकी झोळी दूर फेकली गेली आणि ‘माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी’ या गाण्याप्रमाणेच कडुबाईंची ओटी सोन्यानंच भरून गेली. इथूनच कडुबाईंचा गोड गळा सातासमुद्रापार गेला. त्यामुळे समाज माध्यमांसह टी. व्ही. चॅनल आणि प्रिंट मीडियावर त्या झळकल्या. मग कला, साहित्य आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्वांचं लक्ष वेधल्या गेलं.‌ त्यांना भेटायला अनेक मान्यवर आली. कधीकाळी घरभाडे द्यायला पाचशे रुपये जवळ नव्हते त्यांना आता मदतीचा आधार मिळाला. जगण्याची परवड काही प्रमाणात थांबली.‌ त्या नामवंत कलाकारांच्या स्टेजवर गाऊ लागल्या. एकाच व्यक्तीच्या जगण्यात दोन टोके कशी तयार झाली, याचा प्रत्यक्ष साक्षात्कार कडुबाईंना झाला. आतापर्यंत मंदिरात भजनं, गवळणी गायल्या, पण त्यांना इतका मान सन्मान मिळाला नव्हता. जगायला समाधानकारक मिळत नव्हतं. मात्र जिभेवर ‘जयभीम’ येताच आयुष्याचं सोनं व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कडूबाई नम्रपणे म्हणतात, ‘मी बाबासाहेबांचं प्रबोधनाचं काम गाण्यातून केलं नसते तर जगू शकले नसते. बाबासाहेबांचे विचार अंगी नसते तर मी मेलो असते, माझी लेकरं मेली असती. बाबासाहेबांच्या विचारांनीच आम्हाला जगवले.’ हे समाजवास्तव आहे की, बाबासाहेबांच्या विचारावर जगणारा माणूस उपाशी मरत नाही. त्या माणसाच्या सुख – दु:खाला आधार होणारी अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.कडुबाईंचा जीवन संघर्ष वेगवेगळ्या माध्यमातून समोर आला. त्यांना माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांनी घर दिले. त्यामुळे कडूबाईंच्या जगण्यात स्थिरता आली. गावोगावी भीम गीतांचे कार्यक्रम होऊ लागली. आज जगात जिथे कुठे बाबासाहेबांचे अनुयायी राहत आहेत, अशा देशात कडूबाईंचा आवाज पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना मिळालेली लोकप्रियता अफाट आहे. कडूबाईंना असं वाटतं की, ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समाजातील जातीव्यवस्था मोडीत काढण्याचे कार्य केले. मात्र आपण एकमेकांच्या जाती विचारत आहोत. मला लोकांनी जात विचारली की वाईट वाटते.’ एका निरक्षर भाबड्या लोककलावंताचं मन किती उदात्त हेतू घेऊन काम करत आहे, याची प्रचिती येते. यातून उच्च डिग्री घेऊन जातीच्या कोंडवाड्यात स्वतःला कोंडून घेणारे आम्ही सारे जातीवादी आहोत, हे ठळकपणे अधोरेखित होते. कडूबाईंची उदात भावना, अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणारे आहे.कडूबाई खरात यांच्या आवाजातील अनेक गाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या मोबाईलमध्ये स्टोअर आहेत. तीच गाणी लोकप्रबोधनाचं काम करत आहेत. तोच सूर प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत प्रबोधनाच्या वाटेवरून हलू न देता ताल धरायला लावत आहे.‌ हा ताल सूर एका दिशेने निघाले तर निश्चितच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते.‌ कडुबाईंची मुलं बुलडाणा जिल्ह्यातील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. आता ती मोठी झाली आहेत. तेही कडुबाईंच्या संचात सोबत करत आहेत.‘केवळ बाबासाहेब आणि बाबासाहेबांमुळेच आमच्या जीवनाचा उद्धार झाला.’ असं सांगून आपला आवाज, आपली कला त्या भीम, बुद्ध गीतांत ओतून नवा जोश पेरण्याचे काम करत आहेत. प्रत्येक गाणं संपल्यावर त्या ‘जयभीम’ करायला विसरत नाहीत. अशा कलावंतांमुळेच समाज घडत असते, बदलत असते. म्हणून या गोड गळ्याच्या गायिकेचं गाणं अधिक अधिक सुरेल व्हावं, हीच नितळ भावना.वैजनाथ वाघमारेछत्रपती संभाजी नगर,मो – 8637785963/7758941621

Most Popular