लातूर : लातूर महानगरपालिकेच्या गांडुळ खत निर्मिती प्रकल्पात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याने लातूरकर संतप्त झाले आहेत. “कचऱ्यापासून खत बनवणाऱ्या प्रकल्पात दारूच्या बाटल्यांचा साठा कसा काय?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित करत मनपाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
🌆 लातूरचे स्वप्न – विकास, स्वच्छता आणि सुजलाम लातूर
नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या अपेक्षांनी सुरू झाला. स्व. विलासराव देशमुख यांच्या काळात लातूरला नवा चेहरा मिळेल, असा विश्वास नागरिकांनी बाळगला होता. परंतु आज लातूरच्या नागरिकांचा प्रश्न कायम आहे — “आपण विकासाच्या दिशेने चाललो आहोत की मागे वळत आहोत?”
💧 पाण्यासाठी लढा — मनोहरराव गोमारे यांची जनआंदोलनात भूमिका
लातूरकरांचा जुना आणि जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे “पाणी!” शहरातील प्रत्येक घराला पाणी मिळावे, ही साधी अपेक्षा घेऊन स्व. अॅड. मनोहरराव गोमारे यांनी नागरिकांना एकत्र आणले. त्यांनी “पाणी हक्क आहे, उपकार नाही” अशी ठाम भूमिका घेत सरकारविरोधात आंदोलन केले, जनतेसाठी जेलमध्ये गेले, आणि प्रशासनाला झोप उडवणारा लढा दिला. आजही लातूरकर या लढ्याला स्मरतात आणि म्हणतात — “त्या काळचं नेतृत्व आज हवं आहे.”
🌱 गांडूळ खत प्रकल्प – प्रगतीचे प्रतीक की निष्काळजीपणाचा बळी?
प्रभाग पाचमधील गांडूळ खत निर्मिती प्रकल्प हा लातूरच्या स्वच्छतेचा एक आदर्श मॉडेल होता. वारियर मशीनच्या साहाय्याने कचऱ्याचे डोंगर कमी झाले, परिसर स्वच्छ झाला आणि लातूर देशभरात उदाहरण ठरले. पण आज त्याच प्रकल्पात दारूच्या बाटल्यांचा खच दिसत आहे.
“कचऱ्यापासून खत बनवायचं होतं… आता बाटल्यांपासून बनवणार का?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
🚻 कौस्तुभ दिवेगावकर – स्वच्छतेचा पाया रचणारे अधिकारी
लातूरच्या प्रशासनात एक काळ असा होता, जेव्हा नागरिकांना शहरात सार्वजनिक शौचालय शोधणं ही एक त्रासदायक गोष्ट होती. मात्र तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी ही स्थिती बदलली. त्यांनी बाजारपेठेत, गजबजलेल्या भागात आणि नागरिकांच्या सोयीसाठी अनेक स्वच्छतागृहे उभारली. ही स्वच्छतागृहे केवळ बांधलीच नाहीत तर त्यांची कायमस्वरूपी देखभाल व्यवस्था देखील उभी केली. त्यामुळे शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल घडून आला आणि “लातूर मॉडेल” राज्यात चर्चेत आले.
🏗️ आता अपेक्षा — पुन्हा संघभावना आणि इमानदारीने काम करणाऱ्या टीमची
नवीन आयुक्त आयएएस मानसी मीना आणि उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसुळे यांच्या नेतृत्वाखाली लातूर पुन्हा प्रगतीच्या मार्गावर यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सकारात्मक अधिकारी आणि प्रामाणिक कर्मचारी यांनी एकत्रित येऊन पुन्हा त्या जुन्या ‘लातूर स्पिरिट’ला जाग आणणे गरजेचे आहे.
🗣️ लातूरकरांचा आवाज स्पष्ट आहे:
“आम्हाला पाणी, स्वच्छता आणि जबाबदार प्रशासन हवं आहे — दारूच्या बाटल्या आणि दुर्लक्ष नव्हे, तर गांडुळ खताचा आणि प्रगतीचा सुगंध हवा आहे!”
✊ लातूरकरांच्या मागण्या:
लातूर शहर महानगरपालिकेच्या जुन्या खत निर्मिती प्रकल्पाचे कौतुक करणारी खालील लिंक मध्ये बातमी पहा
गांडूळ खत प्रकल्पाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.
स्वच्छता, पाणीपुरवठा आणि प्रकल्प व्यवस्थापन यावर सातत्याने लक्ष द्यावे.
कौस्तुभ दिवेगावकर यांच्या स्वच्छतेच्या पायाला आणि गोमारे साहेबांच्या पाणीलढ्याला पुन्हा दिशा मिळवून द्यावी.
दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...