लातूर, दि. २० : मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेचा राजकीय पक्ष हे महत्वाचा भाग आहेत. त्यामुळे मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरीक्षण आणि अद्ययावतीकरण याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी पंकज मंदाडे यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदार यादीचे पुनरीक्षण व अद्ययावतीकरण, मतदारांचे फोटो, समान नावाच्या मतदारांचे पूर्ण नाव, मयत मतदारांची नावे वगळणे यासारख्या विविध मुद्द्यांवर राजकीय पक्ष प्रतिनिधी यांनी आपल्या सूचना मांडल्या.

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.
त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.
त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.
नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...