• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

विश्व हिंदी परिषद दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 10, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिल्ली (विशेष प्रतिनिधी):
भारतीय भाषांचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या विश्व हिंदी परिषद या प्रतिष्ठित संस्थेने लातूरचे लोकप्रिय माजी खासदार, संसदरत्न प्रा. डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड यांची दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी नियुक्ती केली आहे. याबाबतची अधिकृत माहिती परिषदचे राष्ट्रीय महासचिव डॉ. विपिन कुमार यांनी पत्राद्वारे दिली.

विश्व हिंदी परिषद ही संस्था देशात आणि परदेशात हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तसेच भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व्यापक स्तरावर कार्य करत आहे. हिंदी भाषेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणे आणि भारतीय भाषांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मता बळकट करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कार्य केले आहे. ते १६ व्या लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. आपल्या संसदीय कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या समित्यांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. विशेषतः भारत सरकार गृह मंत्रालय अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राजभाषा संसदीय समितीचे सदस्य म्हणून तसेच दुसऱ्या उपसमितीचे कार्यकारी संयोजक म्हणून त्यांनी हिंदी भाषेच्या प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य केले.

साहित्य क्षेत्रातही डॉ. गायकवाड यांचे मोठे योगदान आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती या भाषांमध्ये त्यांनी ९० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. इतिहास, समाज, राजकारण, भारतीय संस्कृती आणि सामाजिक समरसता अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. हिंदी भाषा आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या व्यापक कार्याची दखल घेऊन विश्व हिंदी परिषद यांनी त्यांची दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी नियुक्ती केली आहे.

डॉ. गायकवाड यांच्या या नियुक्तीबद्दल वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्र, विश्व हिंदी परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मश्री व पद्मभूषण सन्मानित माजी खासदार यार्लगड्डा लक्ष्मी प्रसाद, राष्ट्रीय उपाध्यक्ष देवी प्रसाद मिश्र, दिल्ली प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष अभिलाषा मिश्रा तसेच राष्ट्रीय महासचिव डॉ. विपिन कुमार यांसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार आणि भारतीय भाषांचे संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

Next Post

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026

संस्कृत संस्कारांचे जतन आणि ज्ञानपरंपरेचा उत्सव; श्री श्री रविशंकर विद्यालयात ‘विश्व संस्कृत दिन’ उत्साहात

September 2, 2026

आयोडिनयुक्त मीठ वापरण्याची ४ कारणे

September 1, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

देवाभाऊंचा ‘शैक्षणिक सर्जिकल स्ट्राईक’; भुसे यांचे अधिकार सचिव-आयुक्तांकडे!

September 4, 2026

कोट्यवधींचा ‘प्रकल्प वर्षा’ आणि कोरडीच राहिलेली जमीन!कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने महाराष्ट्राला काय शिकवले?

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved