
पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असे आरोप केले जात आहेत. दहा लाख रुपये डिपॉझिट न भरल्यामुळे रुग्णालयाने सात महिन्यांची दोन जुळी बाळं पोटात असणाऱ्या तनिषा भिसे यांना उपचार द्यायला नकार दिला, असं रुग्णाचे नातेवाईक सांगत आहेत. दीनानाथमध्ये रुग्णसेवा न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं. तिथे प्रसुती झाल्यावर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले डॉक्टर आणि प्रशासन यांना जबाबदार धरलं. या प्रकरणात उपचार करायला नकार दिला असं दिसत नाही. मात्र, डिपॉझिट दिल्याशिवाय उपचार सुरू करणार नाही अशी अट घालती गेली असेल तर ते योग्य नाही. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 साली आले असले तरी त्याची अंमलबाजवणी व्यवस्थित झालेली नाही.

अजूनही 80 ते 90 टक्के खासगी रुग्णालयं हे नियम पाळत नाहीत. प्रत्येक रुग्णालयाने तिथे मिळणाऱ्या 15 महत्त्वाच्या गोष्टींचे दर त्यांच्या आवारात दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत. मात्र बहुतांश ठिकाणी ते दिसत नाही.” प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात एक रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष आणि त्याचा टोल फ्री नंबर असायला हवा. रुग्णांना काही तक्रार असेल तर ते तिथे फोन करून मदत किंवा सल्ला घेऊ शकतात. केंद्र सरकारच्या वैद्यकीय स्थापना अधिनियम या 2010 च्या कायद्याप्रमाणे खासगी रुग्णालयांनी सरकारने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारणं बेकायदेशीर आहे. मात्र, हा कायदा महाराष्ट्र सरकारनं अजून स्वीकारलेला नाही. तसा दुसरा कायदाही महाराष्ट्रात नाही. या पार्श्वभूमीवर मुळातच रुग्णालयांना अशा पद्धतीने ॲडव्हान्स किंवा डिपॉझिट मागता येतं का? ते भरलं नाही तर रुग्णालय प्रशासन उपचार देणं नाकारू शकतं का? तर तसे नाकारूच शकत नाहीत, तसे असेलच तर जिवापेक्षा पैसा महत्वाचे आहे का. रुग्णालयांना या संदर्भात कोणत्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. याचेही नियमावली दवाखान्याबाहेर लावणे गरजेचे आहे.
काही लोक इतरांना मदत करण्यास किंवा सहानुभूती दर्शवण्यासाठी तयार नसतात, ज्यामुळे माणुसकी कमी होते. नाही इथे कोणी कोणाचा हा कारभार चालू फक्त मनाचा. खोटे सारे पुरावे कसे मरून पुन्हा उरावे. कुठे गेली माणसं आणि माणसाची माणुसकी. शोधतो आहे हा डोळा कोण इथे राहिला आहे भोळा. खासगी रुग्णालयांवर नियंत्रण आणि रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी सामान्य लोकांनी, राजकीय पक्षांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाहिजे.
लेखक
लक्ष्मीकांत कलमूर्गे, बिलोली
जिल्हा नांदेड.
8888087513

