
लातूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने आंबेडकर पार्क येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा लातूरच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. याचे उद्घाटन बीएसएनएलचे लातूर विभागाचे प्रमुख अनिल बनसोडे यांच्या हस्ते झाले. कास्ट्राईबच्या या शिबिरामध्ये 61 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या शिबिरास रक्तदात्यांनी व भीम सैनिकांनी भरभरून प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे, लसाकमचे नरसिंग घोडके जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजकुमार पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव मस्के, लातूर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बनसोडे, जिल्हा सरचिटणीस अशोक माळगे, नागरत्न कांबळे, निलराज बनसोडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राहुल गायकवाड, अतिरिक्त सरचिटणीस महेश कांबळे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सुभाष मस्के, सचिव संजय राऊत, कोषाध्यक्ष सतीश मानकुस्कर, उपाध्यक्ष छगन घोडके, रेनापुर तालुका अध्यक्ष बाबासाहेब इंगळे, निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीराम घोडके, लातूर तालुका अध्यक्ष विशाल जोगदंड, औसा तालुकाध्यक्ष राजकुमार गुंजरगे,माजी विस्तार अधिकारी डी.सी गायकवाड, श्री. सोनकांबळे, दिलीप गायकवाड, लातूर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबुराव बनसोडे, लातूर पतपेढीचे माजी चेअरमन विनायक सावंत, दिव्यांग विभागाचे गिरीश तुबाजी, रवी कुरील, सचिनभाऊ गंगावणे, रंजना चव्हाण, कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या महिला उपाध्यक्ष सरोजा भोसले मॅडम, शीलाताई उघाडे मॅडम, रंजीता गायकवाड, निवृत्त पीएसआय कचरू राऊत, किरणकुमार रायते, सुधीर बोकेफोडे यांच्यासह कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या संलग्न संघटनांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रम घेऊन सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे कास्ट्राईब दिव्यांग विभागाचे विभागीय अध्यक्ष गिरीश तुबाजी हे सकाळपासून शिबीर संपेपर्यंत कर्तव्यावर होते.
रक्तदान स्थळी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. डॉ.आंबेडकर हे देशाला नाही तर जगाला लाभलेले अनमोल रत्न होते. त्यांच्या विचारांची जयंती सर्वानी साजरी करावी, असे मत सुभाष मस्के यांनी व्यक्त केले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षक बांधवांनी प्रयत्न करावेत, असे श्री. माळगे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डी एस नरसिंगे यांनी तर आभार अशोक गायकवाड यांनी मानले. 🌹👍🙏


