
लातूर – आनंद नगर येथील नागरिकांनी यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती एका वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मागील वर्षी डॉल्बी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महिला आणि बालकांचा सहभाग कमी झाला होता, याचा गांभीर्याने विचार करून यंदाच्या जयंती उत्सवासाठी समाजाने एक सशक्त आणि विचारपूर्वक रुपरेषा आखली.
उत्सवामध्ये फक्त काही तरुणांची डॉल्बीसमोरची नाचाची मर्यादा न ठेवता, यावेळी महिलांपासून तर लहान बालकांपर्यंत सर्वांनी सहभागी होत एकत्रितपणे सांस्कृतिक, सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबवले. त्यामुळे जयंतीला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
लातूरकरांनी या बदलाचे भरभरून स्वागत केले असून, आनंद नगरमधील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उत्सवामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे समाजात प्रबोधन करण्यावर भर देण्यात आला.
यशस्वी आयोजनासाठी आणि समाजातील सकारात्मक बदल घडवून आणल्याबद्दल आयोजकांचे, सहभागी नागरिकांचे व सहकार्य करणाऱ्यांचे मन:पूर्वक आभार.

