फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांनी उल्लेखनीय निकालाची परंपरा कायम राखली आहे.

कला महाविद्यालयाचा निकाल 82.21% लागला असून कु. कामिनी कांबळे व कु. गायत्री राजूरकर या 92.17% गुणांसह प्रथम आल्या. एकूण 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 85% पेक्षा अधिक गुण मिळवणारे 57 विद्यार्थी आहेत.



वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल 95.45% असून कु. श्रेया कुंभकरण हिने 97.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. 90% पेक्षा अधिक गुण मिळवणारे 45 विद्यार्थी आहेत.

विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 98.24% असून कु. वैष्णवी पाटोळे व कु. प्रांजल वर्मा यांनी 92% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.

विविध विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललीतभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव, विशाल लाहोटी, सहाय्यक सचिव अॅड.श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, कोषाध्यक्ष संजय बोरा, तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

