फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत दयानंद शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांनी उल्लेखनीय निकालाची परंपरा कायम राखली आहे.
कला महाविद्यालयाचा निकाल 82.21% लागला असून कु. कामिनी कांबळे व कु. गायत्री राजूरकर या 92.17% गुणांसह प्रथम आल्या. एकूण 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 85% पेक्षा अधिक गुण मिळवणारे 57 विद्यार्थी आहेत.
वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल 95.45% असून कु. श्रेया कुंभकरण हिने 97.50% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. 90% पेक्षा अधिक गुण मिळवणारे 45 विद्यार्थी आहेत.
विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 98.24% असून कु. वैष्णवी पाटोळे व कु. प्रांजल वर्मा यांनी 92% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
विविध विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

