मजुरांना उन्हापासून संरक्षणासाठी टोपी व पाण्याच्या बाटल्या वाटप…
लातूर :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांचा वाढदिवस लातूरमध्ये सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या प्यारे खान युवा फाउंडेशनचे अध्यक्ष व पत्रकार सालार शेख यांच्या पुढाकाराने उन्हात काम करणाऱ्या ५०० मजुरांना टोपी व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने मजूर दिवसभर कामासाठी थांबतात, ही बाब लक्षात घेऊन पत्रकार सालार शेख यांनी त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.
या टोपी वितरण कार्यक्रमास होम डीवायएसपी गजानन भातलवंडे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मोईजभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते सर्फराज बाबा मणियार, लालासाहेब शेख, बरकत काझी, युवा उद्योजक फैसलखान कायमखानी, पत्रकार हारून मोमीन, बशीर शेख (कलमवाला) नेताजी जाधव, सलीम शेख, हारून सय्यद, अब्दुल समद शेख,बशीर शेख,शोएब शेख,फुरकान कुरेशी,आयुब शेख,नवाब नासर,शाहरुख सय्यद,असिफ सय्यद,आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल सर्व मान्यवरांनी पत्रकार सालार शेख यांचे अभिनंदन केले.

