• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाटयस्पर्धेत

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
May 25, 2025
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगरचे “केस नंबर ९९” प्रथम

सर्वाधिक बक्षीसे घेत लातूरचे “ बेबी ” दुसरे

लातूर, दि.२४ मे : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालया अंतर्गत लातूर येथे पार पडलेल्या आंतरपरिमंडलीय नाटयस्पर्धेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाच्या नाटय संघाने सादर केलेल्या केस नंबर ९९ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह विविध वर्गवारीतील तीन प्रथम व दोन व्दीतीय पुरस्कारही पटकावले आहेत. तर लातूर परिमंडळाने सादर केलेल्या बेबी या नाटकाला वैयक्त‍िक प्रथम ४ तर ३ दुसऱ्या क्रमांकाची बक्षीसे घेत नाटयनिर्मितीच्या दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लातूर येथे कृषी उत्तपन्न बाजार समितीच्या कै. दगडोजीराव देशमूख नाटयगृहात दि.२३ व २४ मे रोजी पार पडलेल्या नाटय स्पर्धेत लातूर परिमंडळासह नांदेड व छत्रपती संभाजीनगर परिमंडळाची नाटके सादर झाली. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर, लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, प्रेमसिंग राजपूत यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करून सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी श्री औंढेकर यांनी विजेत्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देताना म्हणाले की, महावितरणच्या नाटयस्पर्धा या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना नवी ऊर्जा देणाऱ्या असतात. या स्पर्धेत कर्मचाऱ्यांनी केलेल्या भुमिकांचे कौतूक करत कंपनीच्या ब्रँडींगसाठी कलावंताचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. या स्पर्धेमुळे निश्चीतच प्रत्येक कलावंताच्या मनामधे सहकार्याची भावना निर्माण होईल असा विश्वासही व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद देशमूख व सुमती बिडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर यांनी केले.

या स्पर्धेतील इतर बक्षिसे : दिगदर्शक प्रथम – धनंजय पवार (नाटक बेबी) व्दितीय – रमेश शिंदे (नाटक केसनंबर ९९), अभिनय (पुरूष) – प्रथम – प्रशांत जानराव (नाटक बेबी), अभिनय (पुरूष) व्दितीय– प्रमोद देशमूख (नाटक मिना) अभिनय (स्त्री) प्रथम- सपना भोसले (नाटक केसनंबर ९९), अभिनय (स्त्री) व्दितीय- स्वाती लांडगे (नाटक मीना), उत्तेजनार्थ अभिनय प्रथम- कानीफनाथ सुरवसे (नाटक बेबी), व्दितीय– रमेश शिंदे (नाटक केस नंबर ९९), तृतीय- राजकुमार सिंदगीकर (नाटक मीना), नेपथ्य प्रथम- नितीन सुर्यवंशी (नाटक केसनंबर ९९) व्दितीय- कानीफनाथ सुरवसे (नाटक बेबी) तर प्रकाश योजना प्रथम-अभय येरटे (नाटक केसनंबर ९९) व्दितीय- अमित नाचणे (नाटक बेबी) संगीत प्रथम- महादेव गडदे (नाटक बेबी) व्दितीय- सुशेन पाटील (नाटक मीना), रंगभुषा व वेशभूषा प्रथम दिनेश ठाकूर (नाटक बेबी) व्दितीय- पद्मजा देशमूख (नाटक मीना) तसेच नाटयलेखनाचे प्रथम पारितोषिक प्रमोद देशमूख यांनी पटकावले.

फोटो ओळ- पहिला पुरस्कार प्राप्त छत्रपती संभाजीनगरचा संघ व मान्यवर

Previous Post

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक औंढेकरांनी उद्योजकांच्या जाणून घेतल्या समस्या

Next Post

पांडुरंग देडे – सामाजिक चळवळीचे उर्जाकेंद्र’

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

पांडुरंग देडे – सामाजिक चळवळीचे उर्जाकेंद्र’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved