• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

डॉक्टर्स डे  निमित्त पोद्दार हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात मोफत अस्थिरोग शिबिरात ८८ रुग्णांची तपासणी

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 2, 2025
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून लातूर मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब मिडटाऊन आणि  पोद्दार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग शिबिरात ८८  रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे १५०  वे मोफत आरोग्य शिबीर होते, हे विशेष. 

        या शिबिराचे उदघाटन विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ सुरेश भट्टड , आयएमएच्या माजी अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे, ज्येष्ठ अस्थिशल्य  चिकित्सक डॉ. दिलीप देशपांडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने अशा प्रकारचे आरोग्यदायी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांना आपल्या शुभेच्छा आहेतच, त्याचबरोबर असे  लोकोपयोगी उपक्रम भविष्यातही राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.अशोक पोद्दार यांच्यासह सर्वच डॉक्टर मंडळी सदैव लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात.  लातूरला उंचावर नेण्याचे काम ते करत आहेत,  लातूर आम्हाला नवीन नाही.  लातूरला आम्ही आमचे घर समजतो त्यामुळे लोकांनी प्रेमाने बोलावले की आम्ही अशा उपक्रमांना उपस्थित राहतो, असेही वैशालीताईंनी सांगितले.डॉ.सुरेश भट्टड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून  पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या या अस्थिरोग शिबिरास आपल्याला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. आजचा दिवस डॉक्टरांसाठी अतिशय आनंदाचा आहे. या कार्यक्रमात निमंत्रित करून डॉ. अशोक पोद्दार यांनी एक प्रकारे गुरु – शिष्य परंपरा कायम ठेवण्याचे काम केले आहे. डॉ.अशोक पोद्दार असे सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम सातत्याने आयोजित करत असतात. अकॅडमिक कार्यातही ते अव्वल असतात. अस्थिशल्य  चिकित्सकांच्या सर्व परिषदांना ते आवर्जून उपस्थिती लावून आपल्या ज्ञानात भर घालून त्याचा सर्वांना  कसा उपयोग होईल यासाठी प्रयत्नशिल  असतात. लातूरच्या डॉक्टर मंडळींच्या अडचणी सोडविण्याकामीही डॉ.पोद्दार अग्रेसर असतात, असे डॉ. भट्टड यांनी  सांगितले. 

डॉ. दिलीप देशपांडे यांनी यावेळी बोलताना डॉ. पोद्दार आपल्याला त्यांचे गुरु मानतात , हा माझा नव्हे तर त्यांच्या मनाचा  मोठेपणा असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा आरोग्यदायी यज्ञ ते नियमितपणे राबवित असतात हे सर्वांना  माहिती आहेच. एक प्रकारे ही त्यांची तपस्या आहे. आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून ते असे सामाजिक उपक्रम राबवितात , ही बाब आम्हा सर्व डॉक्टर मंडळींसाठी प्रेरणादायी आहे. आयएमए चे अध्यक्ष  डॉ.अभय कदम यांनी लातुरात मोफत आरोग्य शिबिराचा अनोखा उपक्रम राबविण्याकामी अग्रेसर असणाऱ्या डॉ.अशोक पोद्दार यांचे नाव या उपक्रमस्तही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले जाईल,असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.  डॉ.  सुरेखा काळे यांनीही आपले विचार व्यक्त करून सर्वांना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.  डॉ. अशोक पोद्दार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आपल्या हॉस्पिटलच्या वतीने अशा प्रकारचे आरोग्य विषयक व सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने आपण असे उपक्रम राबविण्याकामी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने रुग्णांना सर्व सेवांमध्ये पन्नास टक्के  सवलत देण्यात आली असून हाडांची ठिसूळता आणि सर्व रुग्णांना मोफत औषधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. आज डॉक्टर्स डे  सोबतच सीए डे  असल्याने सर्व सीए बांधवांनाही डॉ.पोद्दार यांनी शुभेच्छा दिल्या.   या शिबिरात ३५ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले तर ७० रुग्णांची मोफत हाडांच्या ठिसूळतेची तपासणी करण्यात आली. ३२ रुग्णांना व्हिटॅमिन डी ३ च्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. तर १८ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली.

 यावेळी वैशालीताई देशमुख यांचे स्वागत डॉ.अशोक पोद्दार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. भावना पोद्दार यांनी केले.  डॉ. भट्टड यांचे स्वागत डॉ. अभय कदम यांनी केले.  डॉ. सुरेखा काळे यांचे  स्वागत डॉ. ज्योती सूळ यांनी केले.  या प्रसंगी दक्षिण आफ्रिकेतील  कॉम्रेड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत डॉ. आरती झंवर यांनी ९० किमी अंतर ८ तास ३७ मिनिटांमध्ये पूर्ण करून विजय मिळवल्याबद्दल त्यांचा वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच स्पर्धेत संजीव भार्गव यांनी हे अंतर ११ तास १३ मिनिटात पूर्ण केल्याबद्दल त्यांचा डॉ. सुरेश भट्टड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी हे अंतर ११ तास ४५ मिनिटात पूर्ण केल्याबद्दल डॉ. दिलीप देशपांडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या तिन्ही यशस्वी स्पर्धकांना पोद्दार हॉस्पिटल परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनी या सन्मानाबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त केले. प्रत्येक व्यक्तीने आपल्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान ४५ मिनिटे स्वतःसाठी द्यावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली. 

याप्रसंगी आयएमएचे सचिव डॉ. हरिदास, आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ, सचिव डॉ. प्रियंका डावळे,  कैलास कांबळे, रामेश्वर सोमाणी, अजय दुडिले, विजय रांदड, दीपक वारद, रोटरीचे सचिव मालपाणी, अमोल बनाळे, नरेंद्र भुतडा, डॉ. विश्रांत भारती, डॉ. इमरान कुरेशी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. निकिता ब्रिजवासी, डॉ. साक्षी शर्मा, बालाप्रसाद सारडा, जयेश बजाज यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Previous Post

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी माणिक पवार यांची निवड

Next Post

“अपेक्षा, आंबेडकरी समाजाची.!”

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

"अपेक्षा, आंबेडकरी समाजाची.!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महावितरणचे आवाहन

September 26, 2026

तहसील कार्यायात महावितरणच्या किऑस्क सेंटरची सुरवात

September 26, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved