
लातूर येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ लातूर या संघटनेची साप्ताहिक बैठक पार पडली, सेवानिवृतांच्या प्रश्नावर चर्चा झाल्या नंतर माजी सहाय्य्क विक्रीकर आयुक्त माणिकराव गोरोबा पवार यांची राज्य उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली,बैठकीच्या असध्यक्षस्थानी मधुकर साठे हे होते, महाराष्ट्र युवक परिषद तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष, लहुजी साळवे निवृत्त कर्मचारी अध्यक्ष म्हणून ही माणिक पवार यांनी कार्य केलेले आहे, सुशिक्षित बेकारांना नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करणे, गरीब विध्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, महा परुषांच्या जयंती साजरी करणे असे त्यांनी सामाजिक कार्य कलेले आहे, या बैठकीला राज्य अध्यक्ष प्रा, अनंत लांडगे, मराठवाडा अध्यक्ष बलभीम कोथिंबीरे, जिल्हाध्यक्ष प्रा, एस, टी, मस्के, मोहन कांबळे सेलूकर, बी, बी, गायकवाड, प्रा, देविदासराव शिंदे, राजेंद्र बनसोडे, ए, बी, कांबळे, संभाजी शिंदे, उत्तमराव भालेराव, एस, एस, धसवाडीकर, रमेश हणमंटे, श्रीधर ओहळ, जालिंदर बनसोडे, जी, व्ही, जेवरीकर सह बहू संख्य सेवानिवृत्त उपस्थित होते, प्रा, देविदासराव शिंदे यांची उपस्थिती होती

