• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 8, 2025
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

लातूर, (प्रतिनीधी): प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

राज्यातील शंभर गावांना सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठीची सौर ग्राम योजना महावितरणने यापूर्वीच सुरू केली असून त्याच्या अंतर्गत आतापर्यंत १४ गावे सौर ग्राम झाली आहेत. महावितरणच्या योजनेखेरीज आता केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेमुळे गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यास अधिक चालना मिळणार आहे. महावितरणला मॉडेल सौर ग्राम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना मॉडेल सौर ग्राम योजनेसाठीच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी आहे. विविध जिल्ह्यांमध्ये गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या सहा जिल्ह्यातील काही गावांची योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना घरोघरी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच त्या गावातील पथदिवे सौर ऊर्जेवर चालविणे, गावाची पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालविणे अशी विविध कामे सरकारी योजनांच लाभ घेऊन करण्यात येतील. ही स्पर्धा सहा महिने चालणार आहे.

संबंधित ग्राम पंचायतींनी गावकऱ्यांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहन देणे तसेच सार्वजनिक योजनांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणे अपेक्षित आहे. स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर त्या त्या गावात एकूण किती सौर ऊर्जा क्षमता निर्माण झाली याचा अभ्यास करून जिल्ह्यातील विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

मॉडेल सौर ग्राम योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सहा, अकोला जिल्हयातील २६, भंडारा जिल्ह्यातील ६, बुलढाणा जिल्ह्यातील १५, वर्धा जिल्ह्यातील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्पर्धेला सुरुवात झाली आहे व जिल्ह्यानुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत मुदत आहे.

योजनेसाठी जिल्हा स्तरीय समिती स्थापन करून त्या समितीमार्फत जिल्ह्यामध्ये योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख व समन्वय करण्यात येत आहे. या समितीकडून सुरुवातीला गावांची निवड करण्यात येते व त्या गावांमध्ये स्पर्धा होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेत महिना तीनशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे या हेतुने घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅटला तीस हजार रुपये, दोन किलोवॅटला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते. राज्यात आतापर्यंत दोन लाखाहून अधिक वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Previous Post

श्री. व्यंकटराव गोविंदराव पाटील यांचे निधन

Next Post

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved