
लातूरचे मूळ रहिवासी तसेच सध्या पुनावळे, पुणे येथे वास्तव्यास असलेले श्री. व्यंकटराव गोविंदराव पाटील (वय ९२) यांचे दिनांक ५ जुलै २०२५ रोजी रात्री ८.४२ वाजता वृद्धापकाळाने शांत निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी शनिवार, दि. ६ जुलै रोजी सकाळी पुनावळे येथील राहत्या घरी पार पडला.
ते लातुरातील सुप्रसिद्ध लोककलावंत व लोकशाहीर कै. रमाकांत पाटील यांचे वडील होते.
अभियंता भिकाजी पाटील यांचे ते आदरणीय आजोबा होते.
त्यांच्या पश्चात दोन कन्या, सून व पतवंड असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर तसेच स्नेहीवर्गावर शोककळा पसरली आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

