• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

29 जुलै जागतिक व्याघ्रदिन. महाराष्ट्रात केवळ १२ वर्षात २५७ टक्के वाघांची संख्या वाढली. महाराष्ट्रात 446 वाघांची संख्या

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 29, 2025
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


लातूर दि. ( अभय मिरजकर )-महाराष्ट्रातील शाहिर म्हणतात की वाघाच्या जबड्यात घालुनी हात,
मोजिते दात, जात ही आमुची…
पहा चाळुनी पाने आमुच्या इतिहासाची ! जसा वाघाचा रुबाब आहे तैसाचबाबा मराठी माणसांचा पण आहे. व्यासांची संख्या सुंपुष्टात असताना व्याघ्र उभारण्यासाठी प्रयत्नशील आणि वाघाच काळीज प्रदेश महाराष्ट्र ही उपमा सार्थ महाराष्ट्रात येत आहेत. देशात सर्वाधिक वेगाने प्रवासी वाघांची संख्या वाढली आहे. राज्य सध्या 446 वाघांचा अधिवास आहे. चालू बारा वर्षात महाराष्ट्राला 257 टक्के वाघांची संख्या वाढली आहे.


हिंदुस्तानात वाघांचा अधिवास खुप आधीपासून आहे. राजे, महाराजे , सरदार नंतरच्या काळात इंग्रज सरकारचे अधिकारी , या शिवाय शिकारी यांच्या मुळे वाघ लुप्त होतो की काय अशी स्थिती निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरू करण्यात आला . त्यावेळी देशात 1800 वाघांची संख्या नोंदली गेली होती. वाघांची संख्या वाढवण्यासाठी शासनाने देशात व्याघ्र प्रकल्प सुरू केले. आज रोजी देशात 53 व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत.


महाराष्ट्र मध्ये सहा व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प 741.22 चौरस किलोमीटर मध्ये आहे. त्यामध्ये गाभा क्षेत्र 439.84 चौरस किलोमीटर तर बफर क्षेत्र ३०१.३८ चौरस किलोमीटर एवढे आहे. बोर व्याघ्र प्रकल्प 816.27 चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे. त्यामध्ये 138.12 गाभा क्षेत्र असून 678.15 चौरस किलोमीटर क्षेत्र हे बफर क्षेत्र आहे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ११६५.५७ चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे. 600.12 हे गाभा क्षेत्र असून 565.45 हे बफर क्षेत्र आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 1727.59 चौरस किलोमीटर क्षेत्रात आहे. 625.82 चौरस किलोमीटर क्षेत्र हे गाभा क्षेत्र असून 1101.7 चौरस किलोमीटर हे बफर क्षेत्र आहे, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प 1194.94 किलोमीटर क्षेत्रात आहे. 653.67 चौरस किलोमीटर हे गाभाक्षेत्र असून 1241.27 चौरस किलोमीटर हे बफर क्षेत्र आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प 2768.52 चौरस किलोमीटर क्षेत्रात कार्यरत आहेत. याचे गाभा क्षेत्र 1500 . 49 चौरस किलोमीटरचे असून बफरक्षेत्र 10268.03 चौरस किलोमीटर एवढे आहे. वाघांची संख्या वाढवण्यात या व्याघ्र प्रकल्पांचा खूप मोठा सहभाग आहे.
देशामध्ये दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येत असते. महाराष्ट्राचा विचार केला तर 2006 मध्ये राज्यात केवळ 103 वाघ नोंदले गेले होते. त्यानंतर 2010 मध्ये झालेल्या गणनेत ही संख्या 168 वर पोहोचली‌ तर 2014 मध्ये झालेल्या गणनेत वाघांची संख्या 190 वर पोहोचली होती . 2018 मध्ये झालेल्या गणनेत वाघांची संख्या 312 एवढी झाली होती . 2022 मध्ये झालेल्या गणनेत ही संख्या 444 एवढी नोंदली गेली. मागील बारा वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रात वाघांची संख्या तब्बल 257 टक्केने वाढल्याचे दिसून येते.


राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या:
ताडोबा-अंधारी: या प्रकल्पात 97 वाघ आहेत,
पेंच: या प्रकल्पात 73 वाघ आहेत. मेळघाट: या प्रकल्पात 32 वाघ आहेत.
सह्याद्री: या प्रकल्पात 17 वाघ आहेत. नवेगाव – नागझिरा या प्रकल्पात 17 वाघ आहेत. बोर: या प्रकल्पात 8 वाघ आहेत.
सन 2022 च्या गणनेत देशात वाघांची संख्या ही 3682 एवढी असल्याचे निदर्शनास आले आहे. देशात सन 2006 मध्ये 1411 वाघ होते, 2010 च्या गणनेत 1706 वाघ नोंदले गेले होते. 2014 मधील वाघाच्या गणनेत ही संख्या 2226 एवढी झाली होती. सन 2018 मध्ये ही संख्या 2996 एवढी झाली होती. जगाच्या तुलनेत फक्त आपल्या भारतातच तब्बल 75 टक्के वाघ आढळून आले आहेत. मध्यप्रदेश मध्ये 785 वाघांची संख्या होती, कर्नाटकात 563 वाघ नोंदले गेले होते. उत्तराखंड मध्ये 560 वाघांची संख्या होती, महाराष्ट्रात वाघांची संख्या 444 एवढी नोंदली गेली होती. तामिळनाडू मध्ये 306 एवढे वाघ आढळून आले होते.
सर्वाधिक धोकादायक पाणी म्हणजे माणूस असे म्हटले जाते. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मोठ्या संख्येने वाघाची संख्या होती. परंतु शिकार म्हणून किंवा आता तस्करी म्हणून मोठ्या प्रमाणात वाघ मारले जात आहेत. केवळ वाघाची शिकार होते असे नाही तर सध्या विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांची शिकार ही केली जाते. वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही सुद्धा होत असते. पण निर्बंध अथवा कारवाईने ते थांबणार नाही तर त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. ईश्वराने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे या न्यायाने वन्यजीवांनाही त्यांचे पुर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या जागेवर आपण अतिक्रमण केल्यामुळे संघर्ष निर्माण होतो आहे. परंतु आपण त्यांच्यासोबत जगायला शिकले पाहिजे.

Previous Post

खेळ, डिजिटल जुगाराचा

Next Post

🌳 “वयाने पंचाहत्तर… पण ऊर्जा पंचविशीची!”

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

🌳 "वयाने पंचाहत्तर... पण ऊर्जा पंचविशीची!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved