
लातूर- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर ,बाल न्याय मंडळ,आणि कलापंढरी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे दिनांक २९ रोजी बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम अंतर्गत विशेष बालक पोलीस अधिकारी ,बालकल्याण मंडळ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,बालन्याय मंडळ आणि मदत कक्ष यांची कार्य व जबाबदारी या विषयावर लातूर येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजीत कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सञ न्यायाधिश तथा लातूर जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष श्री. व्हि. व्हि .पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. या वेळी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर श्री. पद्माकर केस्तीकर,बालन्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी श्रीमती तेजश्री गुरव, श्री.विजय बाविसकर,कलापंढरी संस्था अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,आस्था शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. पाटील यांनी सर्व उपस्थितना मार्गदर्शन केले. तसेच अश्या कार्यशाळांचे आयोजन करून सर्व घटकांपर्यंत कायदे विषयक मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
या वेळी विजय बारसकर यांनी बालन्याय मंडळ,बालकल्याण समिती यांची निवड प्रक्रिया,कलावधी व कार्यपध्दती आदींबाबत माहीती देऊन बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियम,तसेच पोस्को कायदा या कायद्यातील तरतुदी काय आहेत, कायदा कशासाठी करण्यात आला, या कायद्याची उद्दीष्ट कोणते,तसेच प्रत्यक्ष विधी संघर्ष बालक व काळजी व संरक्षणाची गरज आसलेले बालक कोठे आणि कोणाकडे सादर करावीत ,तसेच पोलीस स्टेशन मध्ये एखादी पोस्कोची केस आल्यास ती कशी हाताळावी या बाबत सविस्तर माहिती दिली. बालका संदर्भात जे नविन शब्दकोश कोणते वापरावे कोणते वापरु नये या मध्ये विशेषतः निरीक्षण ग्रह,विधिसंघर्ष ग्रस्त मुल,ताब्यात घेणे,बालन्यायमंडळ,कामकाज,अंतीम अहवाल,अंतीम आदेश आदी शब्दांचा समावेश करावा आदींची ही सविस्तर माहीती दिली.तसेच या नंतर विधीसेवा प्राधीकरणाचे सविस्तर कार्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव
श्री पि .पी .केस्तीकर यांनी माहिती सांगितली.तसेच बाल न्याय मंडळ परिसरात कार्यरत मदत कक्ष यांचे कार्य व भूमिका श्रीमती आस्था शर्मा यांनी सांगितली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविके मध्ये बी पी सुर्यवंशी यांनी कलाप़ढरी संस्थेची माहीती दिली. कार्यक्रमाचे सुञसंचलन अॅड छाया मलवाडे यांनी तर आभार तेजस्वी गुरव यांनी मानले. या वेळी कार्यक्रमासाठी रेणापुर,चाकूर उदगीर,औसा,आदी तालूक्यासह संपुर्ण जिल्ह्यातून पोलीस अधिकारी, तसेच बालकल्याण समिती,बाल न्याय मंडळ पदाधिकारी,जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे पदाधिकारी,कला पंढरी संस्थेचे कार्यकर्ते,आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड सुनैना बायस,मंगल मगर आदींनी परिश्रम घेतले.

