
लातूर जिल्ह्याला अभिमानाची परंपरा
दयानंद शिक्षण संस्थेत आनंदोत्सव
लातूर, दि. २५ –
देशातील उत्कृष्ट शिक्षकांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिला जातो. या वर्षी देशभरातून १५२ शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यापैकी केवळ ४५ शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. या यादीत दयानंद कला महाविद्यालय, लातूरचे संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे यांची निवड झाली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, लातूर जिल्ह्यातून हा मान मिळविणारे ते पहिलेच शिक्षक ठरले आहेत.

🌟 शैक्षणिक व प्रशासकीय योगदान
डॉ. जगदाळे यांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आणि शैक्षणिक बांधिलकीमुळे संगीत विषयाला नवे आयाम दिले आहेत. त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध शैक्षणिक प्राधिकरणांवर कार्य केले आहे.
• राज्य मंडळ सदस्य
• स्वा. रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अधिसभा सदस्य
• महाराष्ट्र राज्य मंडळ कला शिक्षण अभ्यास मंडळाचे गटप्रमुख
• महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अनुसंधान केंद्र (बालभारती, पुणे) भारतीय संगीत अभ्यास गट सदस्य
• कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – संगीत अभ्यास मंडळ सदस्य
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर – परीक्षा समिती सदस्य
या विविध जबाबदाऱ्यांमधून त्यांनी संगीत शिक्षणाची उन्नती घडवली आहे.
🌟 राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्य
सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांत रुजविण्यासाठी डॉ. जगदाळे यांनी रासेयो (NSS) मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.
• ७ वर्षे कार्यक्रमाधिकारी
• ३ वर्षे जिल्हा समन्वयक
• मागील ५ वर्षांपासून विभागीय समन्वयक
या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य, राष्ट्रप्रेम आणि लोकसहभागाची प्रेरणा दिली. गोंड आदिवासी वस्त्यांवर शिक्षण पोहोचविणे, एचआयव्ही बाधित व अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करणे अशी कार्ये त्यांनी हिरीरीने केली.
🌟 कोविड काळातील उपक्रम
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्र, लोकगीत, पोवाडा आणि व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली. मतदान जनजागृतीसाठी स्वतःच्या खर्चाने पोवाडा तयार करून ग्रामीण भागात प्रचार केला. या उपक्रमाची दखल दिल्ली आकाशवाणी केंद्राने घेतली.
🌟 शैक्षणिक नवोन्मेष
• संदीप जगदाळे डॉट कॉम वेबसाईट, YouTube शैक्षणिक चॅनल आणि स्वरगंध अॅप यांची निर्मिती
• महाराष्ट्रातील पहिले शिक्षक म्हणून १२ वी संगीत विषयासाठी QR कोड आधारित पुस्तक तयार
• अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील संगीत पुस्तक तयार करून राज्यातील सर्वांना मोफत वितरित
• वडार भाषेतून प्रमाणभाषेत इयत्ता पहिलीची कार्यपुस्तिका तयार
या उपक्रमांमुळे शिक्षण अधिक सुलभ व आनंददायी बनले आहे.
🌟 संशोधन व साहित्य योगदान
• २५ पुस्तकांचे लेखन व संपादन (२ हस्तपुस्तिका, २ पाठ्यपुस्तके, १७ स्वतंत्र पुस्तके)
• अमेरिका व कॅनडा येथे त्यांची पुस्तके पोहोचली आहेत
• राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ९० संशोधन निबंध व लेख प्रकाशित
🌟 विद्यार्थ्यांची यशोगाथा
डॉ. जगदाळे यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनीही अनेक कामगिरी साधली आहे.
• ५ विद्यार्थ्यांची नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
• नवी दिल्लीतील विश्व संस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्यांसह सहभाग
• राष्ट्रीय कला उत्सवात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके
• विद्यार्थी आदित्य कुलकर्णीला ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बसण्याचा मान
🌟 अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. संदिपान जगदाळे यांच्या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्य शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, एससीइआरटीचे संचालक डॉ. राहुल रेखावार,शिक्षणाधिकारी डॉ दत्तात्रय मठपती, डायटचे प्राचार्य डॉ.मारुती सलगर, अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललितभाई शहा, रमेशजी राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव विशाल लाहोटी, सहाय्यक सचिव अँड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, कोषाध्यक्ष संजय बोरा तसेच प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, कार्यालय अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले आहे.
🎶 अभिमानाची नोंद
डॉ. संदीपान जगदाळे यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार केवळ त्यांच्या कार्याचा सन्मान नसून, तो लातूर जिल्ह्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे. संगीत, समाजसेवा व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दाखविलेली निष्ठा आणि कर्तृत्व आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरले आहे.

