
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, लातूर मुलांचा संघ दि. २५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेत विजेता ठरला. कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी खो-खो संघातील खेळाडू शिंदे रुतुराज, यु पवन, राखुंडे कार्तिक, चोपडे सचिन, वाघ नागेश्वर, अनेबोईनवाड पवन, पवार सुजल, अनंतवार रामेश्वर, हजारे प्रद्युम्न, पवार अजित, येरगट्टे शुभम व एडके विजय यांचे व त्यांच्या संघ मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ.व्यंकट जगताप, जिमखाना उपाध्यक्षा डॉ.ज्योती देशमुख, डॉ.राजेश शेळके, डॉ. पद्माकर वाडीकर, डॉ.दयानंद मोरे, डॉ.अनिलकुमार कांबळे, डॉ.नितीन तांबोळी, प्रा.भगवान कांबळे, डॉ.अजित पुरी, प्रा.ममता पतंगे आणि संघ व्यवस्थापक डॉ.प्रभाकर आडसूळ, सुधीर सदार उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु प्रा. (डॉ.) इंद्र मणि, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.भगवान आसेवार व कुलसचिव संतोष वेणीकर यांनी खेळाडूंच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

