
दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने शुभेच्छा वर्षाव
लातूर :
दि.२ : शिक्षण क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या देशभरातील 152 शिक्षकांपैकी केवळ 45 शिक्षकांची निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी झाली आहे. यात लातूरचा मान उंचावत दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेश बियाणी, संस्था सदस्य सागर मंत्री यांनी डॉ. जगदाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील आनंदोत्सव
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी व डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, आय.क्यू.ए.सी.चे प्रमुख डॉ. संतोष पाटील, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त करणारे पहिले शिक्षक होण्याचा मान डॉ. संदीपान जगदाळे यांना मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
संस्था पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, सदस्य ललितभाई शहा, रमेशजी राठी, संयुक्त सचिव विशाल लाहोटी, सहाय्यक सचिव अॅड. श्रीकांत उटगे, अजिंक्य सोनवणे, कोषाध्यक्ष संजय बोरा, तसेच कार्यालय अधीक्षक संजय व्यास यांनी डॉ. जगदाळे यांचे अभिनंदन करून कौतुक व्यक्त केले.
लातूरच्या शिक्षण क्षेत्राला अभिमानास्पद अशी ही घटना ठरली असून, डॉ. संदीपान जगदाळे यांच्या राष्ट्रीय सन्मानाने संपूर्ण मराठवाड्याचा मान उंचावला आहे.

