• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर, प्रतिनिधी : महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी व वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे तसेच वीज वापराचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे कसे करता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
लातूर विभागातील लातूर शहर उपविभाग येथे मंगळवारी (दि.१६ जून) सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान मेळावा घेण्यात येणार आहे तर लातूर ग्रामीण व रेणापूर उपविगामध्ये बुधवारी (दि.१७ जून), तसेच मुरुड उपविभाग येथे गुरूवारी (दि.१८ जून) सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहक समाधान मेळावा घेण्यात येणार आहे.
तसेच निलंगा विभागांतर्गत मंगळवारी (दि.१६ जून) किल्लारी उपविभाग, बुधवारी (दि.१७ जून) कासारशिरशी उपविभागात तर गुरुवारी (दि.१८ जून) औसा, निलंगा व शिरुर अनंतपाळ उपविभागात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहक समाधान मेळावा घेण्यात येणार आहे.
त्याचबरोबर उदगीर विभागातील उदगीर शहर व ग्रामीण उपविभाग तसेच जळकोट उपविभात मंगळवारी (दि.१६ जून) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेदरम्यान तर अहमदपूर, शिरुरताजबंद, चाकूर उपविभागात बुधवारी (दि.१७ जून) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेदरम्यान स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहक समाधान मेळावा घेण्यात येणार आहे.
महावितरणच्या वतीने सांगण्यात आले की, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती रिअल-टाईममध्ये उपलब्ध होते. त्यामुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि ऊर्जाबचत करणे अधिक सुलभ होते. तसेच मीटर रीडिंगसाठी प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता राहत नसल्याने बिलिंग प्रक्रिया अधिक अचूक व पारदर्शक बनते.
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज वापर, बिलाची स्थिती, देय तारखा आणि इतर महत्त्वाच्या सूचना मोबाईलद्वारे तत्काळ मिळू शकतात. मीटरमध्ये छेडछाड झाल्यास त्याची माहिती त्वरित उपलब्ध होत असल्याने वीज वितरण व्यवस्थेची सुरक्षितता वाढण्यास मदत होते.
ग्राहक समाधान मेळाव्यांमध्ये उपस्थित अधिकारी व तंत्रज्ञ नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करणार असून स्मार्ट मीटरविषयी पसरलेल्या गैरसमजांवरही वस्तुनिष्ठ माहिती दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संवाद अधिक मजबूत होऊन डिजिटल व पारदर्शक वीज सेवेला चालना मिळेल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
महावितरणने सर्व ग्राहकांना संबंधित उपविभाग स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ग्राहक समाधान मेळाव्यांना उपस्थित राहून स्मार्ट मीटरबाबत प्रत्यक्ष माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

हरित भविष्याच्या दिशेने १५० चिमुकल्यांचे हात सरसावले; ‘आमचं ग्रीन लातूर’च्या माध्यमातून ७० हजार सीड बॉल निर्मिती

Next Post

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026

हरित भविष्याच्या दिशेने १५० चिमुकल्यांचे हात सरसावले; ‘आमचं ग्रीन लातूर’च्या माध्यमातून ७० हजार सीड बॉल निर्मिती

June 14, 2026

Recent News

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026

स्मार्ट मीटर जनजागृतीसाठी आजपासून महावितरणचे उपविभागनिहाय ग्राहक समाधान मेळावे

June 15, 2026

हरित भविष्याच्या दिशेने १५० चिमुकल्यांचे हात सरसावले; ‘आमचं ग्रीन लातूर’च्या माध्यमातून ७० हजार सीड बॉल निर्मिती

June 14, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

लातूरच्या मातीतून उमललेल्या कलावंतांनी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग महोत्सवात जिंकली मनेए.पी. डान्स ग्रुपच्या मराठमोळ्या सांस्कृतिक सादरीकरणाला उद्योजक, मान्यवरांची दाद

June 18, 2026

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved