लातूर : लातूर येथील लालबहादुर शास्त्री कॉलनी, आर्वी येथील रहिवासी सुरेखा – सुनील बेदमुथा यांचे कनिष्ठ सुपुत्र प्रणव बेदमुथा याने सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (C.A.)च्या अंतिम परीक्षेत उल्लेखनीय सुयश मिळवले आहे.
बेदमुथा परिवार मूळचे निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील रहिवासी असून प्रणव हा हाडोळीचा पहिला सनदी लेखापाल (C.A.) ठरला आहे.
कठोर मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्याने ही अवघड परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.
त्याने आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील, अनिल काका, सपना काकी, आजी शारदाबाई तसेच मार्गदर्शक गुरु C.A. संतोष संचेती यांना दिले आहे.
त्याच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल
भ. महावीर मल्टिस्टेट सोसायटीचे उपाध्यक्ष विनोद छाजेड, संतोष कोटेचा, लालबहादुर शास्त्री गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन राजेश डुंगरवाल, जैन संघाचे अध्यक्ष विपीन कोचेटा, डॉ. उदय देशपांडे, घेवरजी कोचेटा,
तसेच लातूर जैन समाज व हाडोळी ग्रामस्थांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

