
लातूरच्या तनिष्क जाधव याने लखनौ येथे १ लाख मेन्स डबल टायटल व मुंबई येथे सुपर कप खेचून आणला. लखनौ येथील स्पर्धा ए आय टी ए या संस्थेकडून आयोजित केली होती तर एम एस एल टी ए यांच्याकडून आयोजन करण्यात आले होते. तनिष्क हा लातूरचे भूमिपुत्र व सुप्रसिद्ध तबला वादक पंडित मुकेश जाधव यांचा सुपुत्र आहे.
यापूर्वी तनिष्क जाधव याने खेलो इंडिया व इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत देदीप्मान यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल शिष्यवृत्ती देऊन त्याचा सन्मान करण्यात आला
तनिष्कच्या या यशाबद्दल गुरु संदीप कीर्तने, वडील पंडित मुकेश जाधव, आई सोनाली जाधव, आजोबा श्रीपतराव जाधव, डॉ. संदीप जगदाळे, प्रा. अंगद गायकवाड, संजय सुवर्णकार, सोनू डगवाले, मीनाक्षी कोळी, विजय श्रीमंगले यांनी अभिनंदन केले आहे.

