
नुकत्याच कोल्हापूर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व पन्हाळगड एज्युकेशन पब्लिक अॅण्ड कॉम्पलेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षा खालील मुलींसाठी राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा सन 2024-25 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लातूर विभागाकडून श्री श्री रविशंकर माध्यमिक विद्यालय, लातूरचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत एकूण आठ विभागाचे संघ सहभागी होते.
या स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करत आपल्या विद्यालयाच्या संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. अंतिम लढतीत मुंबई विभागाचा 15.12, 15.8 अशा गुणांनी पराभव करत या राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. ही बाब लातूर विभागासाठी तसेच या विद्यालयासाठी गौरवाची व अभिमानाची आहे.
या स्पर्धेत कर्णधार श्रावणी काकडे, सायली बिसेनी, गायत्री बिराजदार, राजनंदिनी स्वामी, हर्षदा येरमाळकर, रिया क्षिरसागर, मनाली जोशी, जान्हवी सारगे, माहेश्वरी गोरे, चैत्राली कुलकर्णी, संस्कृती मलवाडे, सायली धारेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सौ. शिला सलगरे, नरेंद्र स्वामी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर आप्पा स्वामी सर, अभिषेक गिरी सर, अमर नरहरे सर, कपिल पटणे सर यांचेही अधिक मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
लातूर विभागाच्या संघाचे भरभरुन कौतुक केले जात आहे. या विजयी संघास व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे संचालक राजेंद्र कोळगे सर, सुनंदा कोळगे मॅडम, मुख्याध्यापिका सोनाली कुलकर्णी मॅडम, प्रशासक आशिष कोळगे सर, उपमुख्याध्यापिका सुलभा जोशी मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत

