
लातूर, दि. २६ : लातूरचे सुपुत्र, जागतिक ख्यातीचे तबलावादक आणि पंडित शांताराम चिगरी गुरुजींचे पट्टशिष्य पंडित मुकेश जाधव यांना यावर्षीचा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अंबाजोगाई येथे आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात उद्या दि. २७ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात तबला वादनाच्या माध्यमातून पं. मुकेश जाधव यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध देशात त्यांनी तबला वादनाचे असंख्य कार्यक्रम सादर करून भारतीय संगीताची पताका उंचावली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार प्रदान होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
समारोहात पुरस्कार वितरणानंतर रात्री ८ वाजता पंडित मुकेश जाधव यांचे स्वतंत्र तबला वादन आयोजित करण्यात आले आहे. संगीतप्रेमींसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
पंडित मुकेश जाधव यांचा गौरव होत असल्याबद्दल
डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. अंगद गायकवाड, सोनू डगवाले, संजय सुवर्णकार, मीनाक्षी कोळी व विजय श्रीमंगले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या समारोहाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे आयोजक दगडू लोमटे यांनी केले आहे.

