
लातूर दि. २९ मागील वर्षी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात दिंडी या लोकनृत्य कला प्रकारात कु. दिशा सोनटक्के हिने भारतातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता. दिनांक 30, 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या कालावधीत पुणे येथे विश्व साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनात कु. दिशा दिंडी हे लोकनृत्य सादर करणार आहे. साहित्य संमेलनासाठी जगभरातील अनेक साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
दिशा सोनटक्के ही दयानंद कला महाविद्यालयात इयत्ता १२ चे शिक्षण घेत आहे. तिच्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी दिशाचा सत्कार केला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. संदीपान जगदाळे हे उपस्थित होते. दिशा हिच्या निवडीबद्दल पर्यवेक्षक उपप्राचार्य डॉ अंजली जोशी, डॉ. प्रशांत दीक्षित, संगीत विभाग प्रमुख डॉ देवेंद्र कुलकर्णी, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले आहे.

