
लोकशाही उत्सव समिती यांच्या वतीने दिनांक 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान विविध उपक्रम लातूर शहरांमध्ये राबवण्यात आले.
आज 30 जानेवारी महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त स्त्री सन् मानार्थ स्त्री पुरुष समानता हा विषय घेऊन लातूर शहरातील विविध सामाजिक संघटनाच्या महिलांनी संविधान रॅलीचे आयोजन केले होते.
यामध्ये शहरातील नारी प्रबोधन मंच ,सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सह्याद्री देवराई , राजश्री शाहू महाविद्यालय, दयानंद विधी महाविद्यालय यांचा सहभाग होता.
स्त्रियांच्या सन्मानार्थ स्त्री पुरुष समानतेच्या घोषणा देत महिलांनी संविधान रॅलीचे आयोजन केले होते.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच महात्मा ज्योतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन केले.
संविधान उद्देशिकेचे वाचन यावेळेस महिला सदस्यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकशाही समिती लातूर, सुमती जगताप ,नंदिनी पडिले, विधी महाविद्यालयाच्या अॅड लता महाजन, सुपर्ण जगताप , शिवाजीराव शिंदे , डॉ गणेश गोमारे,
अँड उदय गवारे, अनिस चे माधव बावगे, राजश्री शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य शिंदे सर, उत्तरेश्वर बिराजदार, मनपा पर्यावरण प्रमुख संमती मेतरे , वृक्ष प्राधिकरण समाधान सुर्यवंशी, प्रा दशरथ भिसे , डॉ बी आर पाटील, प्राचार्य कुसुम, मोरे ,कुसुम जाधव ,अनुराधा देऊळगावकर , आकाश, सोनकांबळे, नयन राजमाने, श्याम जैन, राहुल लोंढे, सुनील गायकवाड भीम दुनगावे, आझम पठाण, संगीता शहरकर, मंदाकिनी शिंदे , पांडुरंग देडे, महाविद्यालयीन विद्यार्थी हे शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

