• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी पोंभुर्ले येथे दर्पण पुरस्कार सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
January 12, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

▪️जिल्हा माहिती अधिकारी या गटात यावर्षी पासून पुरस्कार, पहिल्या पुरस्काराने पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील सन्मानित

पुणे , दि. ६ :
मराठी पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘दर्पण’ पुरस्कार पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावर्षीपासून शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वैशिष्ट्यपूर्ण व प्रभावी लेखन करणाऱ्या अधिकाऱ्याला ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्याची विशेष बाब महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने घोषित केली होती. या नव्या उपक्रमातील पहिला पुरस्कार पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना जाहीर करण्यात आला होता. मंगळवारी (दि. ६) हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात जांभेकर पोंभुर्ले–देवळवाडी येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकातील ‘दर्पण सभागृहात’ राज्यस्तरीय पत्रकार दिन व ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या समारंभात राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकार तसेच पत्रकारितेशी संबंधित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारितेचे लोकशाहीतील स्थान अधोरेखित केले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य ती पार पाडते, असे त्यांनी सांगितले. मराठी पत्रकारितेचे आद्य प्रणेते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीबद्दल कॉलेज जीवनापासून आपल्याला विशेष आकर्षण होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या जन्मभूमीत आपल्या हस्ते प्रदान होत असल्याचा विशेष आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘दर्पण’ पुरस्कार हा पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

याचवेळी ना. प्रा. राम शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावातील स्मारक प्रकल्पासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून मदत देण्याची घोषणा केली. ग्रामपंचायत व पत्रकार कल्याण निधीने यासंदर्भात तातडीने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सूचित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी पोंभुर्ले हे गाव महाराष्ट्रातील पत्रकारांची पंढरी व्हावी, या भावनेतून स्मारक उभारण्यात आल्याचे सांगितले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारिता, संशोधन व विद्वत्तेतील कार्य आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, सरपंच प्रियांका धावडे, सुधाकर जांभेकर यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्त पत्रकार, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सन २०२५ च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, नांदेडच्या दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, मसूर (जि. सातारा) येथील ‘गुंफण’ दिवाळी अंकाचे संपादक बसवेश्वर चेणगे, सातार्‍यातील ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीरामपूरच्या दै. स्नेहप्रकाशचे संपादक प्रकाश कुलथे, अहिल्यानगरच्या दै. नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक श्रीराम जोशी, यवतमाळच्या दै. सकाळचे अनिल काळबांडे, कोल्हापूर येथील मँगो एफ.एम.चे केंद्रप्रमुख आशिष कदम आणि पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचा समावेश होता. सिंधुदुर्गमधील दै. लोकमतचे विजय पालकर यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी सौ. श्वेता पालकर यांनी स्वीकारला.

याचप्रसंगी ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर : कर्तृत्वाचा एक शोध’ या त्रिखंडात्मक चरित्राचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमर शेंडे यांनी केले.

Previous Post

🔥 लातूर भाजपमध्ये अजित पाटील कव्हेकरांचा ‘शिस्तीचा हातोडा’ – १८ पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन 🔥

Next Post

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान आपले कर्तव्य उपायुक्त पंजाबराव खानसोळे

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान आपले कर्तव्य उपायुक्त पंजाबराव खानसोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026

घरगुती मीटरला तब्बल १ लाख ४२ हजारांचे वीज बिल!

September 22, 2026

मेक इन इंडिया, एआय आणि सॅटेलाइटचा बोलबाला… मग शेतकऱ्यांच्या पंचनाम्याला अजूनही कागद-कलम का?पावसाअभावी पिके करपली; तंत्रज्ञानाच्या युगात पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची पुन्हा परीक्षा नको!

September 21, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगा

September 24, 2026

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved